पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी केले अजय कुमार याचे अभिनंदन

Posted On: 23 OCT 2026 7:29PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 ऑक्‍टोबर 2026 

 

आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 400 मीटर टी64 प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अजय कुमार याचे अभिनंदन केले.

अजय कुमार याने धावपट्टीवर केलेल्या कामगिरीमुळे भारतासाठी अभिमानाचा आणखी एक क्षण निर्माण झाला, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले. त्याने यापुढेही नवनवीन आव्हानांना सामोरे जावे आणि अधिक मोठे यश संपादन करावे, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

पंतप्रधान कार्यालयाने समाज माध्‍यम ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे,

“आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 400 मीटर टी64 प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल अजय कुमार याचे अभिनंदन! त्याने धावपट्टीवर केलेल्या कामगिरीमुळे भारतासाठी अभिमानाचा आणखी एक क्षण निर्माण झाला आहे. त्याने यापुढेही नवनवीन आव्हानांना सामोरे जावे आणि अधिक मोठे यश संपादन करावे, अशा शुभेच्छा. : पंतप्रधान @narendramodi”

 

* * *

सुवर्णा बेडेकर/निखिलेश चित्रे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2327659) अभ्यागत कक्ष : 6