Posted On:
23 OCT 2026 5:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर 2026
भारत आणि रशिया यांच्यातील द्विपक्षीय नौदल युद्धसराव 'इंद्रा 2026' च्या यशस्वी सांगतेनंतर भारतीय नौदलाचे ‘सह्याद्री’ हे जहाज रशियातील व्लादिवोस्तोक येथून 20 ऑक्टोबर 2026 रोजी रवाना झाले.
या सरावामध्ये समुद्रकिनारी होणारा सराव आणि समुद्रातील समन्वित कार्यान्वयन असे दोन भाग होते. समुद्रकिनारी झालेल्या टप्प्याअंतर्गत दोन्ही बाजूंच्या प्रमुख अधिकाऱ्यांमधील संवाद, परस्परांच्या युद्धनौकांना भेटी, विषय तज्ज्ञांचे आदानप्रदान, मोहिमांच्या समन्वयाचे उपक्रम, क्रीडा सामने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांमुळे दोन्ही नौदलांच्या जवानांना एकमेकांसोबत व्यावसायिक संवाद साधणे तसेच त्यांचे विचार आणि मोहिमांच्या पद्धतींची देवाणघेवाण करता येईल.
तर समुद्रातील टप्प्यात दोन्ही नौदलांची समन्वित युद्धकौशल्यांची प्रात्यक्षिके, कार्यान्वयन समन्वय, हेलिकॉप्टर ऑपरेशन्स आणि वैद्यकीय सुटका मोहिमांचे प्रात्यक्षिक इत्यादी प्रकारचे सराव यशस्वीरित्या पार पाडले. या उपक्रमांमुळे दोन्ही नौदलातील अधिकाऱ्यांना समुद्रात समन्वित कार्यपद्धतींचा सराव झाला, संवादाला चालना मिळाली आणि कार्यान्वयन समन्वय आणि आंतरकार्यक्षमता वाढीला लागली.
क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमांमुळे परस्पर मैत्री अधिक दृढ झाली आणि रशियन फेडरेशन आणि भारतीय नौदल अधिकाऱ्यांमधील वैयक्तिक बंध दृढ झाले. यामुळे दोन्ही राष्ट्रांच्या नौदलामधील व्यावसायिक उपक्रम तसेच प्रदीर्घ नौदल संबंधांना उजाळा मिळाला.
इंद्रा 2026 या सरावाच्या यशस्वी सांगतेबरोबरच भारत आणि रशिया यांच्यातील दीर्घकालीन संरक्षण आणि सागरी भागीदारी पुन्हा एकदा नव्याने दृढ झाली. या सरावामुळे सातत्यपूर्ण नौदल सहभाग, व्यावसायिक सहकार्य आणि आंतरकार्यक्षमता यांचे महत्त्व अधोरेखित झाले. सागरी सुरक्षेला योगदान देण्यासाठी आणि परस्पर सामंजस्य वाढविण्यासाठी या घटकांचे महत्त्व देखील स्पष्ट झाले. तसेच, या सरावातून दोन्ही देशांच्या नौदलांनी सुरक्षित, स्थिर आणि शांततापूर्ण सागरी वातावरण निर्माण करण्यासाठी व्यक्त केलेली सामायिक वचनबद्धता प्रतिबिंबित झाली.
_20261023153745_1688a6.jpeg)
_20261023153755_0a684e.jpeg)
_20261023153804_50e4ed.jpeg)
_20261023153813_37db6a.jpeg)
_20261023153822_eb8fe9.jpeg)
_20261023153831_1001cc.jpeg)
* * *
राधिका अघोर/भक्ती सोनटक्के/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai