पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आशियाई पॅरा गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल शैलेश कुमार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अभिनंदन केले

Posted On: 22 OCT 2026 6:52PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 ऑक्‍टोबर 2026 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शैलेश कुमार यांचे अभिनंदन केले. आशियाई पॅरा गेम्स 2026 मधील पुरुषांच्या उंच उडी अर्थात हाय जंप टी42/टी63 प्रकारात शैलेश कुमार यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आणि स्पर्धेतील नवा विक्रम प्रस्थापित केला.

मोदी म्हणाले की, ही एक उल्लेखनीय कामगिरी असून ती त्यांच्यातील कौशल्य, सातत्य आणि समर्पणाचे दर्शन घडवते. त्यांनी असेही नमूद केले की, भारताला त्यांचा अभिमान वाटतो.

पंतप्रधान कार्यालयाने एक्स समाजमाध्यमावर पोस्ट करत म्हटले की,

"आशियाई पॅरा गेम्स 2026 मधील पुरुषांच्या हाय जंप टी42/टी63 प्रकारात शैलेश कुमार यांनी शानदार कामगिरी केली आहे! त्यांनी शानदार उडी मारत सुवर्णपदक जिंकले आणि  स्पर्धेत एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे! ही एक उल्लेखनीय कामगिरी असून ती त्यांच्यातील कौशल्य, सातत्य आणि समर्पणाचे प्रतीक आहे. भारताला त्यांचा अभिमान वाटतो: PM @narendramodi”

 

* * *

सुषमा काणे/राजेश शिरभाते/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2327045) अभ्यागत कक्ष : 7