पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल जयंती हिचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

Posted On: 22 OCT 2026 6:48PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 ऑक्‍टोबर 2026 

 

आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मधील महिलांच्या 400 मीटर T47 या क्रीडा प्रकारात उत्तम वेळ नोंदवत रौप्य पदक जिंकल्याबद्दल जयंती हिचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

या संदर्भात पंतप्रधान कार्यालयाने X या समाजमाध्यमावर सामायिक केलेला संदेश,

"दमदार रौप्य पदक!

उत्तम वेळ नोंदवत जयंती हिने आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मधील महिलांच्या 400 मीटर T47 या क्रीडा प्रकारात रौप्य पदक जिंकले. तिच्या कठोर मेहनतीबद्दल आणि क्रीडा भावनेबद्दल तिचे अभिनंदन. तिला शुभेच्छा : PM @narendramodi”

 

* * *

राधिका अघोर/तुषार पवार/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2327016) अभ्यागत कक्ष : 7