Posted On:
07 OCT 2026 9:16PM by PIB Mumbai
जपानच्या पंतप्रधान सानाए ताकाइची यांनी दिलेल्या स्नेहपूर्ण शुभेच्छांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे आभार मानले आणि या वर्षीच्या जुलै महिन्यात त्यांनी केलेल्या भारत भेटीचे स्मरण केले. ‘अविस्मरणीय प्रसंग’ असे त्यांनी या भेटीचे वर्णन केले आहे. या भेटीमुळे भारत-जपान भागीदारी अधिक दृढ झाली असे ते म्हणाले. भारत आणि जपान आपल्या दीर्घकालीन मैत्रीच्या आधारे जागतिक शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी एकत्रितपणे काम करत राहतील, यांचा पंतप्रधानांनी ठामपणे पुनरुच्चार केला. भारत-जपान राजनैतिक संबंधांचा 75 वा वर्धापन दिन हा द्विपक्षीय संबंधांना नव्या उंचीवर नेण्याची संधी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘एक्स’ या समाजमाध्यमावरील संदेशात पंतप्रधान म्हणतात :
“पंतप्रधान ताकाइची, खूप खूप धन्यवाद.
या वर्षी जुलैमध्ये झालेला तुमचा भारत दौरा माझ्यासाठीही अविस्मरणीय राहील. त्यामुळे भारत-जपान भागीदारी अधिक दृढ झाली.
दोन्ही देश आपली दीर्घकालीन मैत्री पुढेही कायम ठेवतील आणि जागतिक शांतता, स्थैर्य व समृद्धीसाठी एकत्रितपणे काम करतील.
मला विश्वास आहे की, आपल्या राजनैतिक संबंधांचांन 75 वा वर्धापनदिन द्विपक्षीय संबंधांना नव्या उंचीवर घेऊन जाईल.
高市首相、誠にありがとうございました。
今年7月の首相のインド訪問は、私にとっても忘れられないものとなりました。この訪問により、日印のパートナーシップはさらに強固なものとなりました。
両国は、長年にわたる友好関係を基盤として、世界の平和、安定、繁栄のために引き続き協力してまいります。
国交樹立75周年を迎えるにあたり、両国関係が新たな高みに達することを確信しております。
@takaichi_sanae
***
NehaKulkarni / SavitaMhaskar / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai