पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकणाऱ्या प्रणव देसाईचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

Posted On: 21 OCT 2026 9:29PM by PIB Mumbai

आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या टी-64 प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत कांस्यपदक पटकावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रणव देसाईचे अभिनंदन केले.

प्रणव देसाईने मिळवलेले कांस्यपदक त्याच्या मेहनतीचे फलित असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. त्याचा वेग, समर्पण आणि दृढनिश्चय खरोखरच प्रशंसनीय असल्याचेही पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान कार्यालयाने ‘एक्स’ या समाजमाध्यमावरील संदेशात म्हटले आहे :

“प्रणव देसाई यांनी उत्कृष्ट कामगिरी करत कांस्यपदक पटकावले आहे. आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या टी-64 प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल त्याचे अभिनंदन. त्याचा वेग, समर्पण आणि दृढनिश्चय खरोखरच प्रशंसनीय आहे, PM @narendramodi”

***

NehaKulkarni / ShradhhaMukhedkar / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2326423) अभ्यागत कक्ष : 5