पंतप्रधान कार्यालय
आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकणाऱ्या प्रीती पालचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
Posted On:
21 OCT 2026 7:13PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये महिलांच्या धावण्याच्या 100 मीटर टी-35 स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्याबद्दल प्रीती पालचे अभिनंदन केले.
दोन शर्यतींमध्ये सहभागी होऊन दोन रौप्यपदके जिंकत प्रीतीने या स्पर्धेतील संस्मरणीय कामगिरीची सांगता केली आहे, असे पंतप्रधान म्हणाले. 100 मीटर आणि 200 मीटर या दोन्ही स्पर्धांमधील हे यश तिची उल्लेखनीय प्रगती, असाधारण वेग आणि अढळ निर्धार दर्शवते, असे त्यांनी सांगितले. सातत्यपूर्ण प्रयत्न आणि आत्मविश्वासाच्या बळावर काय साध्य करता येते, हे प्रीतीने दाखवून दिले आहे. भारत या यशाचा आनंद साजरा करत आहे, असेही पंतप्रधानांनी म्हटले.
पंतप्रधान कार्यालयाने ‘एक्स’ या समाजमाध्यमावरील संदेशात म्हटले आहे :
“दोन शर्यती, दोन रौप्यपदके!
आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मधील संस्मरणीय कामगिरीची सांगता करताना प्रीती पालने आणखी एक शानदार कामगिरी केली आहे. यावेळी तिने महिलांच्या 100 मीटर टी-35 स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. 100 मीटर आणि 200 मीटर या दोन्ही स्पर्धांमधील हे यश तिची उल्लेखनीय प्रगती, असाधारण वेग आणि अढळ निर्धार दर्शवते. सातत्यपूर्ण प्रयत्न आणि आत्मविश्वासाच्या बळावर काय साध्य करता येते, हे प्रीतीने दाखवून दिले आहे. भारत तिच्या यशाचा आनंद साजरा करत आहे : पंतप्रधान @narendramodi”
***
Nilima Chitale / Shraddha Mukhedkar / Madhura Nerurkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2326320)
अभ्यागत कक्ष : 5