पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल दिलीप गावित याचे पंतप्रधानांकडून अभिनंदन

Posted On: 21 OCT 2026 7:30PM by PIB Mumbai

आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या 100 मीटर टी47 प्रकारात उत्कृष्ट वेळ नोंदवत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिलीप गावित याचे अभिनंदन केले.

 

त्याचा वेग आणि कौशल्य यांमुळे देशाची मान उंचावली आहे, असे नमूद करून पंतप्रधानांनी या देदीप्यमान यशाबद्दल दिलीप गावित याचे मनःपूर्वक अभिनंदन केले. आगामी स्पर्धांमध्येही तो विजयाची हीच लय कायम राखेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

 

पंतप्रधान कार्यालयाने ‘X’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे,

 

“आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये दिलीप गावित याने पुरुषांच्या 100 मीटर टी47 प्रकारात उत्कृष्ट वेळ नोंदवत सुवर्णपदक जिंकून असाधारण कामगिरी केली आहे. त्याचा वेग आणि कौशल्य यांमुळे देशाची मान उंचावली आहे. या देदीप्यमान यशाबद्दल दिलीप याचे मनःपूर्वक अभिनंदन. आगामी स्पर्धांमध्येही त्याने विजयाची हीच लय कायम राखावी, ही सदिच्छा. : पंतप्रधान @narendramodi”

 

***

Nilima Chitale / Madhuri Pange / Madhura Nerurkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2326309) अभ्यागत कक्ष : 5