पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल मोहम्मद यासिर याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले

Posted On: 21 OCT 2026 6:46PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत  पुरुषांच्या गोळा फेक F46  प्रकारात, या हंगामातील आपली उत्कृष्ट फेक  नोंदवत रौप्य पदक पटकावणाऱ्या  मोहम्मद यासिर याचे अभिनंदन केले.
मागील स्पर्धेपासून आतापर्यंतचा त्याचा प्रवास हा अनेक वर्षांची चिकाटी, कठोर परिश्रम आणि सतत सुधारणा करत राहण्याच्या दृढनिश्चयाचे प्रतीक आहे, असे नमूद करत  मोदी यांनी मोहम्मद यासिर याच्या या प्रशंसनीय कामगिरीचे कौतुक केले आणि  पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

'एक्स'  वरील एका पोस्टमध्ये पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे:

"मोहम्मद यासिर याने  आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय प्रगती केली असून, पुरुषांच्या गोळाफेक   F46' प्रकारात  या हंगामातील आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदवत रौप्य पदक जिंकले आहे. मागील स्पर्धेपासूनचा त्याचा प्रवास हा अनेक वर्षांची चिकाटी, कठोर परिश्रम आणि सतत सुधारणा करत राहण्याच्या दृढनिश्चयाचे प्रतीक  आहे. मोहम्मद यासिर याच्या या प्रशंसनीय कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन आणि  पुढील वाटचालीसाठी  खूप खूप शुभेच्छा: पंतप्रधान @narendramodi"

***

Nilima Chitale / Sushma Kane / Madhura Nerurkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2326284) अभ्यागत कक्ष : 5