संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय लष्करासाठी प्रगत लो लेव्हल हलक्या वजनाची रडार खरेदी करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने 770 कोटी रुपयांच्या करारावर केली स्वाक्षरी

Posted On: 21 OCT 2026 3:30PM by PIB Mumbai

संरक्षण मंत्रालयाने 'भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड' सोबत प्रगत  लो  लेव्हल हलक्या वजनाची रडार' (LLLR-I) खरेदी करण्यासाठी सुमारे 770  कोटी रुपयांचा करार केला आहे. 21  ऑक्टोबर 2026  रोजी नवी दिल्ली येथे संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला.

LLLR-I प्रणालीमध्ये लढाऊ विमानांच्या आकाराची लक्ष्ये आणि छोटे /सूक्ष्म  ड्रोन शोधण्याची व त्यांचा मागोवा घेण्याची क्षमता आहे. तसेच, यामध्ये हवाई लक्ष्यांचा प्राधान्यक्रम निर्धारित करण्याची अतिरिक्त क्षमताही आहे. यामुळे भारतीय लष्कराला मानवरहित हवाई प्रणालींपासून निर्माण होणाऱ्या धोक्यांचा यशस्वीपणे सामना करणे शक्य होईल.

 सरकारच्या विकसित भारत @2047 या  ध्येयाशी सुसंगत असलेली ही खरेदी, हवाई संरक्षण प्रणालींच्या स्वदेशीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. यामुळे भारतातील संरक्षण उत्पादन परिसंस्थेला, तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना मोठी चालना मिळेल. तसेच, एक सक्षम, आत्मनिर्भर आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक संरक्षण उद्योग उभारण्यास मदत होईल.

***

Nilima Chitale / Madhura Nerurkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2326164) अभ्यागत कक्ष : 11