पंतप्रधान कार्यालय
आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्याबद्दल राम रतन सिंगचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
Posted On:
20 OCT 2026 9:25PM by PIB Mumbai
आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या डिस्कस थ्रो (थाळीफेक) F51/52/53 क्रीडाप्रकारात रौप्यपदक जिंकल्याबद्दल राम रतन सिंगचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
पॅरा क्रीडा स्पर्धांमध्ये हर्षोल्लास साजरा करण्यासाठी भारताला आणखी एक निमित्त मिळाले आहे असे सांगत पंतप्रधानांनी राम रतनचे प्रयत्न आणि त्याने दाखवलेल्या जिद्दीबद्दल अभिमान व्यक्त केला.
पंतप्रधान कार्यालयाने एक्स समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये लिहिले आहे:
पॅरा क्रीडा स्पर्धांमध्ये हर्षोल्लास साजरा करण्यासाठी भारताला मिळाले आणखी एक कारण!
राम रतन सिंगने आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 पुरुषांच्या डिस्कस थ्रो (थाळीफेक) F51/52/53 क्रीडाप्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत रौप्य पदक पटकावले आहे. राम रतन याचे प्रयत्न आणि त्यानी दाखवलेल्या दृढनिश्चयाचा अभिमान वाटतो: PM @narendramodi.
***
Neha Kulkarni / Bhakti Sontakke / Madhura Nerurkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2325987)
अभ्यागत कक्ष : 3