पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आशियायी पॅरा गेम्समध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल मनिष नरवाल याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले

Posted On: 20 OCT 2026 7:33PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 ऑक्‍टोबर 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मनीष नरवाल याचे अभिनंदन केले. मनीष याने आशियायी पॅरा गेम्समधील पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल एसएच1  प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत रौप्य पदक पटकावले आहे.

मनीषने आपल्या एकाग्रतेच्या आणि समर्पणाच्या जोरावर सातत्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे, असे नमूद करत पंतप्रधान मोदींनी त्याचे अभिनंदन केले आणि त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान कार्यालयाने एक्स या समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये म्हटले आहे की,

"मनीष नरवालने आशियायी पॅरा गेम्समध्ये पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल एसएच1 6 प्रकारात शानदार कामगिरी करत रौप्य पदक जिंकले आहे. मनीषने आपल्या एकाग्रतेच्या आणि समर्पणाच्या बळावर सातत्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा : PM @narendramodi"

 

* * *

शैलेश पाटील/राजेश शिरभाते/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2325628) अभ्यागत कक्ष : 9