पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आशियायी पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या जलतरणाच्या 100 मीटर फ्रीस्टाइल S13 स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल रवी के. बुडिगिना यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

Posted On: 19 OCT 2026 10:11PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 ऑक्‍टोबर 2026

 

आशियायी पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या जलतरणाच्या 100 मीटर फ्रीस्टाइल S13 स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रवी के. बुडिगिना यांचे अभिनंदन केले आहे.

रवी के. बुडिगिना यांची जिद्द, मेहनत आणि खेळ भावनेचेही कौतुक पंतप्रधानांनी कौतुक केले आहे. हे यश देशासाठी अभिमानास्पद क्षण असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी रवी के. बुडिगिना यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

या संदर्भात पंतप्रधान कार्यालयाने X या समाजमाध्यमावर सामायिक केलेला संदेश, 

"भारतासाठीचे एक विशेष रौप्य पदक! आशियायी पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या जलतरणाच्या 100 मीटर फ्रीस्टाइल S13 स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल रवी के. बुडिगिना यांचे अभिनंदन. त्यांची जिद्द, मेहनत आणि खेळ भावना खरोखरच कौतुकास्पद आहे. हे यश देशासाठी अभिमानास्पद क्षण आहे. आगामी काळातही त्यांना असेच यश मिळत राहो हीच सदिच्छा : PM @narendramodi”

 

* * *

शैलेश पाटील/तुषार पवार/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2325465) अभ्यागत कक्ष : 9