ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
नियंत्रित आणि धोकादायक स्फोटक पदार्थांच्या ऑनलाईन विक्रीविरोधात सीसीपीएची कारवाई
केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाच्या (सीसीपीए) हस्तक्षेपानंतर सात ऑनलाईन मंचांवरून हटवले 3,940 विक्रेते
ऑनलाईन मंचावर स्फोटक पदार्थांची विक्री होत असल्याचे आढळल्यास, त्याची तक्रार राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनच्या (एनसीएच) 1915 या क्रमांकावर करण्याचे आवाहन
Posted On:
19 OCT 2026 7:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर 2026
केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन अथॉरिटी-सीसीपीए) ग्राहक संरक्षण कायदा, 2019 आणि ग्राहक संरक्षण (ई-कॉमर्स) नियम, 2020 यांसह स्फोटक पदार्थ कायदा,1884, अमोनियम नायट्रेट नियम, 2012 आणि इतर लागू नियमांनुसार कारवाई सुरू केली आहे. अमोनियम नायट्रेट, गन पावडर, पिक्रिक ॲसिड आणि पेंटाएरिथ्रिटॉल टेट्रानायट्रेट यांसारख्या नियंत्रित आणि धोकादायक स्फोटक पदार्थांची डिजिटल मंचावर अनधिकृतपणे नोंदणी करणे, त्यांची माहिती उपलब्ध करून देणे, जाहिरात करणे आणि विक्रीस प्रोत्साहन देणे, यांविरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे. ग्राहकांची सुरक्षितता सुनिश्चित करणे, सार्वजनिक सुरक्षेचे रक्षण करणे आणि ई-कॉमर्समधील जबाबदार व्यावसायिक पद्धतींना प्रोत्साहन देणे, हा या कारवाईचा मुख्य उद्देश आहे.
या पदार्थांचा समावेश स्फोटक पदार्थांमध्ये होतो. त्यामुळे स्फोटक पदार्थ कायदा, 1884 आणि त्याअंतर्गत तयार केलेल्या नियमांनुसार त्यांच्यावर नियंत्रण ठेवले जाते. या पदार्थांची कायदेशीर खरेदी-विक्री करण्यासाठी विहित परवाना घेणे आवश्यक आहे. ऑनलाईन मंचांनी विक्रेत्यांकडे पेट्रोलियम आणि स्फोटक सुरक्षा संघटनेचा (पीईएसओ – पेट्रोलियम अँड एक्सप्लोसिव्ह्ज सेफ्टी ऑर्गनायझेशन) वैध परवाना असल्याची खात्री करणे आणि त्या परवान्याचा तपशील उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. तसेच, खरेदी करण्यापूर्वी ग्राहकांची ओळख आणि त्यांच्याकडे आवश्यक परवाना आहे की नाही, याची पडताळणी करणेही आवश्यक आहे.
केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (सीसीपीए) पुढील ऑनलाईन मंचांवर, स्फोटक पदार्थांची नोंदणी आणि विक्री केल्याप्रकरणी कारवाई सुरू केली आहे.
- इंडियामार्ट
- ट्रेडइंडिया
- डायल४ट्रेड
- जस्टडायल
- सिग्मा-अल्ड्रिच इंडिया
- एक्स्पोर्टर्सइंडिया
- आयबायकेमिकल्स
या मंचांनी एकूण 3,940 विक्रेते आणि संबंधित नोंदींचा तपशील सादर केला आहे. या सर्व मंचांवरून संबंधित नोंदी हटवण्यात आल्या आहेत.
|
S. No.
|
Platform (Entity)
|
Substance
|
No. of sellers
|
-
|
ExportersIndia.com (Weblink.In Pvt. Ltd.)
|
Ammonium Nitrate
|
386
|
|
PETN
|
5
|
|
Picric Acid
|
30
|
|
Total ExportersIndia.com
|
421
|
-
|
TradeIndia (Infocom Network Pvt. Ltd.)
|
Picric Acid and PETN
|
166 (210 listing entries)
|
-
|
Dial4Trade (Dial4Trade Technologies Pvt. Ltd.)
|
Ammonium Nitrate
|
11
|
-
|
Sigma-Aldrich Chemicals Pvt. Ltd. (Merck)
|
Ammonium Nitrate and PETN
|
Sell their own products on its platform and do not host third-party sellers.
|
-
|
Ibuychemikals
|
Picric Acid
|
Sell their own products on its platform and do not host third-party sellers.
|
-
|
IndiaMART InterMESH Ltd.
|
Ammonium Nitrate
|
2,700
|
|
Gunpowder/PETN
|
22
|
|
Picric Acid
|
370
|
|
Total IndiaMART InterMESH Limited
|
3,092
|
-
|
Just Dial Limited
|
Ammonium Nitrate
|
206
|
|
Total
|
3,940
|
* * *
सुवर्णा बेडेकर/आशुतोष सावे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2325273)
अभ्यागत कक्ष : 7