राष्ट्रीय मानवाधिकार आयोग
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून(एनएचआरसी), MyGov च्या सहकार्याने 33 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित ऑनलाइन मानवाधिकार प्रश्नमंजुषा-2026 च्या 10 विजेत्यांची घोषणा
मानवाधिकार, पीएचआर कायदा आणि एनएचआरसीच्या कार्यांबद्दल जागरूकता वाढवणे या उद्देशाने करण्यात आले प्रश्नमंजुषेचे आयोजन
या प्रश्नमंजुषेला देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील सहभागींचा प्रतिसाद, 1,67,127 व्ह्यूज आणि 26,459 जणांची नोंदणी
18-24 या वयोगटातील सहभागींची सर्वाधिक नोंदणी
राज्यनिहाय सहभागात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू यांची आघाडी
Posted On:
19 OCT 2026 2:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर 2026
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने(एनएचआरसी) आपल्या 33 व्या स्थापना दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या 'मानवाधिकार प्रश्नमंजुषा-2026: जीवन, स्वातंत्र्य, समानता आणि प्रतिष्ठेचा उत्सव' या ऑनलाईन स्पर्धेच्या 10 विजेत्यांची घोषणा केली आहे. ही प्रश्नमंजुषा 1 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर 2026 या कालावधीत MyGov च्या सहकार्याने आयोजित करण्यात आली होती. मानवाधिकार, मानवाधिकार संरक्षण कायदा (पीएचआरए), 1993 आणि देशभरात मानवाधिकारांचे संवर्धन व संरक्षण करण्यातील एनएचआरसी'चे कार्य, अधिकार आणि कर्तव्ये यांबद्दल सर्वांना जागरूक करणे हा या प्रश्नमंजुषेचा उद्देश होता.
कु. आरती महाजन यांनी प्रथम क्रमांकाचे रु. 15,000/- चे पारितोषिक पटकावले आहे. द्वितीय क्रमांक रु. 10,000/- चे पारितोषिक कु. रितिका यांनी, तर तृतीय क्रमांकाचे रु. 5,000/- चे पारितोषिक कु. तुबा बिनाझिर यांनी पटकावले आहे. प्रत्येकी रु. 2,000/- ची सात उत्तेजनार्थ पारितोषिके आदित्य गुप्ता, तरुण, राणी मंडळ, बसंत कुमार महतो, लिखित कुमार ए आणि कु. दीपिका मडासू यांना मिळाली आहेत.
या प्रश्नमंजुषेमध्ये देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून सहभाग नोंदवला गेला. यात 1,67,127 व्ह्यूज होते आणि 26,459 जणांनी नोंदणी केली. त्यापैकी बहुतांश 18-24 वयोगटातील होते. राज्यनिहाय सहभागात उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि तामिळनाडू हे अव्वल स्थानावर राहिले.
5,753 सहभागींनी 15 पैकी 15 गुण मिळवले, ज्यामधून नियमांनुसार MyGov टीमद्वारे संगणकीय सोडतीद्वारे 10 विजेते निश्चित करण्यात आले. सहभागींना 300 सेकंदात जास्तीत जास्त 15 प्रश्नांची उत्तरे देणे आवश्यक होते.
* * *
आशिष सांगळे/शैलेश पाटील/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2325081)
अभ्यागत कक्ष : 11