पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जी.बी.पंत सोसायटी ऑफ हिमालयन एन्वार्यनमेंट अँड डेव्हलपमेंटची 27वी बैठक संपन्न; 4 प्रकाशनांचे अनावरण


भूपेंद्र यादव यांनी जैवविविधता संवर्धनामध्ये उपलब्धता आणि लाभांच्या वाटपाचे अधिकार आणि समुदाय सहभागाच्या महत्त्वावर भर दिला

Posted On: 15 OCT 2026 2:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर 2026

केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली येथे 'जी.बी. पंत सोसायटी ऑफ हिमालयन एन्व्हॉयर्नमेंट अँड डेव्हलपमेंट'ची 27वी बैठक आयोजित करण्यात आली.

पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाचे (MoEFCC) सचिव  नरेंद्र भूषण; महासंचालक (वने) आणि विशेष सचिव संतोष तिवारी, मंत्रालयातील इतर वरिष्ठ अधिकारी आणि जी.बी. पंत सोसायटीचे सदस्य या बैठकीस उपस्थित होते.

बैठकीदरम्यान, यादव यांनी हिमालयीन परिसंस्थेतील स्थानिक ग्रामस्थांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण कल्याणात योगदान देण्यासाठी ’उपलब्धता आणि लाभांच्या वाटपाचे अधिकार' तसेच लोक जैवविविधता नोंदणी पुस्तिकेचे महत्त्व अधोरेखित केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2047 पर्यंत भारतीय हिमालयीन क्षेत्रात पर्यावरणीय सुरक्षा आणि शाश्वत सामाजिक-आर्थिक विकास यांचा समतोल साधणारी धोरणात्मक चौकट विकसित करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.

बैठकीदरम्यान, संस्थेने केलेल्या कामाच्या ज्ञान भांडारात भर घालणाऱ्या चार पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. ही पुस्तके भागीरथी इको-सेंसिटिव्ह झोनमधील जैवविविधता संवर्धन पद्धती, गंगोत्री हिमनदी प्रणाली, ई-पीबीआर गव्हर्नन्स आणि भारतीय हिमालयीन क्षेत्रातील रामसर पाणथळ जागा या विषयांवर आधारित आहेत.

ही चार प्रकाशने खालीलप्रमाणे आहेत:

1.  बायोडायव्हर्सिटी अँड इट्स कन्झर्व्हेशन प्रॅक्टिसेस फॉर भागीरथी इको-सेंसिटिव्ह झोन

2.  गंगोत्री ग्लॅशिएटेड सिस्टम

3.  ई-पीबीआर गव्हर्नन्स फॉर द इंडियन हिमालयन रीजन

4.  रामसर वेटलँड्स ऑफ द इंडियन हिमालयन रीजन

 

 

नितीन फुल्लुके/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2323816) अभ्यागत कक्ष : 11