पंतप्रधान कार्यालय
समृध्दीकडून सक्षमीकरणाकडे प्रशासनाला नेण्याविषयीचा एक लेख पंतप्रधानांनी केला सामायिक
Posted On:
14 OCT 2026 4:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर 2026
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांनी लिहिलेला एक लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केला आहे.
भारताच्या प्रशासनाचा दृष्टिकोन समृद्धीकडून सक्षमीकरणाकडे कशाप्रकारे वळत आहे, ज्यामुळे नागरिक विकास प्रक्रियेत सक्रिय सहभागी होऊ शकतील; हे या लेखातून अधोरेखित केले आहे. स्वच्छता, गॅस जोडणी, आरोग्यसेवा आणि कर्जपुरवठ्याची उपलब्धता यांसारखे उपक्रम तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यावर आणि लोकांना त्यांचे जीवनमान सुधारण्याची संधी निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करतात. 2047 पर्यंत 'विकसित आणि सशक्त भारत' घडवण्याच्या संकल्पनेच्या केंद्रस्थानी हा दृष्टिकोन आहे.
आपल्या ‘एक्स’ वर पंतप्रधानांनी पोस्ट केले आहे;
“भारताच्या प्रशासनाचा दृष्टिकोन समृद्धीकडून सक्षमीकरणाकडे वळत आहे. याद्वारे नागरिकांना विकास प्रक्रियेत सक्रिय सहभागी होण्यास सक्षम केले जात आहे; हे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी या लेखात मांडलेले आहे.
स्वच्छता आणि गॅस जोडणीपासून ते आरोग्यसेवा आणि पतपुरवठ्यापर्यंत, सर्व सेवा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यावर आणि लोकांना त्यांचे जीवनमान सुधारण्याच्या संधी निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. हा दृष्टिकोन 2047 पर्यंत 'विकसित आणि सशक्त भारत' घडवण्याच्या संकल्पनेच्या केंद्रस्थानी आहे.”
नितीन फुल्लुके/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2323300)
अभ्यागत कक्ष : 13
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam