पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पंतप्रधानांनी केली माँ शैलपुत्रीची प्रार्थना

Posted On: 11 OCT 2026 9:47AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीच्या आरंभी शांतीची देवी माँ शैलपुत्रीची प्रार्थना केली आहे.

त्यांचे दैवी आशीर्वाद प्रत्येकाच्या हृदयात संयम आणि आत्मविश्वासाचा प्रकाश जागवोत आणि त्यांचे आशीर्वाद सर्व नागरिकांसोबत रहावेत, अशी पंतप्रधानांची इच्छा आहे.

यावेळी मोदींनी देवीला समर्पित एक भक्तिगीत देखील शेअर केले.

पंतप्रधानांनी 'एक्स' वर लिहिले आहे की,

नवरात्रीच्या प्रारंभी, आम्ही शांतीची अधिष्ठात्री देवता, माता शैलपुत्रीच्या चरणी वंदन करतो. तिच्या दिव्य कृपेने सर्वांच्या संयमाचा आणि आत्मविश्वासाचा दिवा प्रज्वलित होवो. देशवासियांना मातेचा आशीर्वाद सदैव लाभो, हीच मनोकामना आहे. 

***

नितीन फुल्लुके/राजेश शिरभाते/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2321891) अभ्यागत कक्ष : 5