पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

स्वराज्याच्या सेवेसाठी समर्पण करणाऱ्या निःस्वार्थी शूर पूजकांवर प्रकाश टाकणारे एक संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी केले सामायिक

Posted On: 08 OCT 2026 5:17PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 ऑक्टोबर 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, आज राष्ट्रसेवेसाठी वैयक्तिक सुखसोयींचा त्याग करणाऱ्यांच्या निःस्वार्थ वृत्ती आणि समर्पणावर प्रकाश टाकणारे एक संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे.

आपल्या एक्स माध्यमावर पंतप्रधानांनी लिहिले आहे;

"भस्मीकृतस्वार्थसौख्यपरिचर्चितविग्रहाः।

स्वराज्ययोगनिर्मग्ना धन्यास्ते वीरयोगिनः॥"

ज्यांनी आपल्या वैयक्तिक सुखांचा त्याग करून आपले संपूर्ण जीवन स्वतःच्या शासनाच्या सेवेसाठी समर्पित केले आहे, तेच खरे वीरभक्त आणि खऱ्या अर्थाने त्यांच्यामुळे राष्ट्र धन्य झाले आहे .

नेहा कुलकर्णी/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2320846) अभ्यागत कक्ष : 5