पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

रुपी सोरेन जी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

Posted On: 08 OCT 2026 2:16PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 ऑक्टोबर 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रुपी सोरेन जी यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले.

आदिवासी समाजाच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी सदैव काम केल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. या दुःखद प्रसंगी आपल्या शोक संवेदना हेमंत जी, कल्पना जी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबासोबत असल्याचे ते म्हणाले.

‘एक्स’वर एका पोस्टमध्ये, पंतप्रधानांनी सामायिक केले:

"रुपी सोरेन जी यांच्या निधनाने दुःख झाले आहे. त्यांनी नेहमीच आदिवासी समुदायांच्या सक्षमीकरणासाठी काम केले. या दुःखद प्रसंगी हेमंत जी, कल्पना जी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाच्या दुःखात आपण सहभागी आहोत."
 

नितीन फुल्लुके/सुषमा काणे/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2320693) अभ्यागत कक्ष : 2