पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान मोदींनी दुटप्पीपणाने वागणारे जुने जग निकाली काढून भारताची कहाणी कशी नव्याने प्रस्थापित केली आहे, यावर प्रकाश टाकणारा स्वपन दासगुप्ता यांचा लेख पंतप्रधानांनी केला सामायिक
Posted On:
08 OCT 2026 12:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 ऑक्टोबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वपन दासगुप्ता यांनी लिहिलेला एक लेख सामायिक केला आहे.
पंतप्रधान मोदींनी दुटप्पीपणाने वागणारे जुने जग निकाली काढून भारताची कहाणी कशी नव्याने प्रस्थापित केली आहे, याविषयी या लेखात स्वपन दासगुप्ता यांनी लिहिले आहे. आर्थिक सुधारणांच्या जोडीने लक्ष्यित कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून सुधारणा आणि समृद्धी, सांस्कृतिक निष्ठा आणि तंत्रज्ञान यांना कसे एकत्र आणले गेले आहे, यावरही यात प्रकाश टाकण्यात आला आहे.
पंतप्रधान कार्यालयाने आपल्या ‘एक्स’वर पोस्ट केले आहे:
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्वैताचे जुने जग मोडून भारताची कथा नव्याने घडवली आहे, असे @swapan55 यांनी लिहिले आहे आर्थिक सुधारणांच्या जोडीने लक्ष्यित कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्स कार्यरत असताना, सुधारणा आणि समृद्धी, सांस्कृतिक निष्ठा आणि तंत्रज्ञान यांना कसे एकत्र आणले गेले आहे, यावर त्यांनी प्रकाश टाकला आहे.
हा विचारप्रवर्तक लेख नक्की वाचा!.”
नितीन फुल्लुके /संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2320606)
अभ्यागत कक्ष : 4