पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

प्रमुख प्रशासक म्हणून देशसेवेची 25 वर्षे पूर्ण केल्याबद्दल नायजेरियाचे राष्ट्रपती बोला अहमद तिनुबू यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल पंतप्रधानांकडून कृतज्ञता व्यक्त

Posted On: 07 OCT 2026 8:36PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नायजेरियाचे राष्ट्रपती बोला अहमद तिनुबू यांनी दिलेल्या हार्दिक शुभेच्छांबद्दल त्यांचे आभार मानले. भारत आणि नायजेरिया हे निकटचे भागीदार असून ‘ग्लोबल साऊथ’चे अग्रगण्य आवाज आहेत, याचा त्यांनी पुनरुच्चार केला. भारत आणि नायजेरियामधील धोरणात्मक भागीदारी बळकट करण्यासाठी तसेच अधिक समावेशक, समृद्ध आणि शांततापूर्ण जगाच्या समान दृष्टिकोनाला पुढे नेण्याप्रती मोदी यांनी आपली वचनबद्धता व्यक्त केली.

मोदी यांनी X या समाज माध्यमावरील संदेशात म्हटले आहे,

भारत आणि नायजेरिया हे निकटचे भागीदार असून ‘ग्लोबल साऊथ’चे अग्रगण्य आवाज आहेत. आमची धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करण्यासाठी आणि अधिक समावेशक, समृद्ध व शांततापूर्ण जगाच्या आमच्या समान दृष्टिकोनाला पुढे नेण्यासाठी सहकार्य कायम ठेवण्यास मी उत्सुक आहे.

@NGRPresident


माधुरी पांगे/रेश्मा बेडेकर/प्रिती मालंडकर 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2320417) अभ्यागत कक्ष : 12