पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान 8 ऑक्टोबर रोजी दहाव्या 'इंडिया मोबाईल काँग्रेस'चे उद्घाटन करणार
‘स्केल विदाऊट बाऊन्ड्रीज’ या संकल्पनेवर होणार आयएमसी 2026 चे आयोजन
आयएमसी 2026 चे चार प्रमुख स्तंभ - सृष्टी: भविष्याची निर्मिती; संवर्धन: विकासाला गती; सशक्त: संधींचा विस्तार; आणि सुरक्षा: विश्वासाचे सक्षमीकरण
आयएमसी 2026 स्मार्ट मोबिलिटी, स्टेडियम अनुभव , इंडस्ट्रियल रोबोटिक्स आणि ट्रान्सपोर्ट टेक्नॉलॉजी या नव्या क्षेत्रांवर देणार विशेष भर
आयएमसी 2026 मध्ये 100 पेक्षा जास्त देश होणार सहभागी
Posted On:
07 OCT 2026 6:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी सुमारे 10 वाजता यशोभूमी, नवी दिल्ली येथे दहाव्या 'इंडिया मोबाईल काँग्रेस' (आयएमसी) चे उद्घाटन करतील. या प्रसंगी ते उपस्थितांना संबोधितही करतील.
दूरसंचार विभाग आणि सेल्युलर ऑपरेटर असोसिएशन ऑफ इंडिया यांनी संयुक्तपणे या कार्यक्रमाचे आयोजन 7 ते 10 ऑक्टोबर दरम्यान केले आहे. ‘स्केल विदाऊट बाऊन्ड्रीज’ ही आयएमसी 2026 ची संकल्पना असून, ती डिजिटल नवोन्मेष, भावी काळातील तंत्रज्ञानाने युक्त संपर्कव्यवस्था आणि तंत्रज्ञानाधारित विकासातील भारताच्या वाढत्या क्षमतेचे दर्शन घडवत आहे.
सृष्टी: भविष्याची निर्मिती; संवर्धन: विकासाला गती; सशक्त: संधींचा विस्तार; आणि सुरक्षा: विश्वासाचे सक्षमीकरण हे आयएमसी 2026 चे चार प्रमुख स्तंभ असतील. हे संमेलन नवोन्मेष आणि भावी काळातील तंत्रज्ञानाइतक्या प्रगत डिजिटल पायाभूत सुविधा, तंत्रज्ञानावर आधारित आर्थिक विकास, सर्वसमावेशक डिजिटल पोहोच आणि सुरक्षित व सक्षम डिजिटल परिसंस्थेच्या विकासावर लक्ष केंद्रित करेल. आयएमसी 2026 मध्ये जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील नेते, धोरणकर्ते, उद्योग तज्ज्ञ, स्टार्टअप्स, गुंतवणूकदार आणि नवोन्मेषक डिजिटल परिसंस्थेतील नव्या संधींचा शोध घेण्यासाठी एकत्र येतील.
2026 च्या या आवृत्तीत 5G आणि 6G, नेक्स्ट-जनरेशन एआय नेटवर्क, सेमीकंडक्टर्स, नॉन-टेरेस्ट्रियल नेटवर्क, सायबर सुरक्षा, क्वांटम कम्युनिकेशन, एंटरप्राइज ट्रान्सफॉर्मेशन, सर्क्युलर इकॉनॉमी आणि ईएसजी, तसेच इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग या नऊ प्रस्थापित प्रमुख क्षेत्रांचा समावेश असेल. याशिवाय, या कार्यक्रमात स्मार्ट मोबिलिटी, स्टेडियम एक्सपिरियन्स, इंडस्ट्रियल रोबोटिक्स आणि ट्रान्सपोर्ट टेक्नॉलॉजी या चार नव्या क्षेत्रांचा विस्तार करण्यात आला आहे.
आयएमसी 2026 मध्ये 100 पेक्षा जास्त देशांतील 1.5 लाखांहून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. यामध्ये 500 पेक्षा जास्त भागीदार आणि प्रदर्शक, 600 हून अधिक स्टार्टअप्स आणि 900 हून अधिक विचारवंत सहभागी होतील. या कार्यक्रमात 2,000 पेक्षा जास्त तंत्रज्ञानाचा वापर केलेल्या केसेस आणि 120 हून अधिक सत्रे आयोजित केली जातील.
सुषमा काणे/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2320333)
अभ्यागत कक्ष : 6
Read this releasein:
Tamil
,
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Gujarati
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam