अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत आणि बांगलादेशाच्या सीमेलगत सीमेपलीकडून होत असलेल्या सोन्याच्या तस्करीविरोधात महसूल गुप्तचर संचालनालयाची कारवाई, तस्करीसाठी परदेशातून आणलेले 8.3 किलो सोने जप्त, चौघांना अटक

Posted On: 06 OCT 2026 10:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 ऑक्टोबर 2026

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या वतीने (DRI) संघटित सोने तस्करीविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत, संचालनालयाने भारत आणि बांगलादेश सीमेलगत केलेल्या एका यशस्वी कारवाईत तस्करीसाठी परदेशातून आणलेले सुमारे 8.3 किलो सोने जप्त केले आहे. या जप्त केलेल्या या सोन्याचे बाजार मूल्य अंदाजे 12.37 कोटी रुपये इतके आहे. या तस्करी प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आली आहे.

 

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांना या तस्करीच्या बाबतीत गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी कूचबिहार जिल्ह्यातील भारत आणि बांगलादेशाच्या सीमेलगत पाळत ठेवली होती. या दरम्यान 5 ऑक्टोबर 2026 रोजी चौधुरीहाट इथल्या भारत आणि बांगलादेश सीमेलगत कूचबिहारच्या दिशेने दोन दुचाकींवरून जात असलेल्या चार जणांना अधिकाऱ्यांनी अडवले. या संशयितांची वैयक्तिक झडती घेतली असता, त्यांच्यापैकी दोघांनी खास शिवलेल्या कापडी कंबरपट्ट्यांमध्ये सोन्याची बिस्किटे लपवल्याचे अधिकाऱ्यांना आढळले. 

 

या चारही जणांकडून प्रत्येकी 116 ग्रॅम वजनाची एकूण 72 सोन्याची बिस्किटे हस्तगत करण्यात आली आहेत. 1962 च्या सीमाशुल्क कायद्यातील संबंधित कलमांअंतर्गत, सुमारे 8.3 किलो वजनाचे आणि अंदाजे 12.37 कोटी रुपये मूल्याचे तस्करीसाठी परदेशातून आणलेले हे सोने जप्त करण्यात आले असून या प्रकरणात सहभागी असलेल्या चारही जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढचा तपास सुरू आहे.

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी कूचबिहार जिल्ह्यातील भारत आणि बांगलादेशाच्या सीमेलगत दीर्घकाळ गुप्त पाळत सुरूच ठेवली होती, त्यामुळेच ही यशस्वी कारवाई करता आली. आंतरराष्ट्रीय सीमांमधून जाणाऱ्या मार्गांवरून चालणाऱ्या संघटित सोने तस्करीची जाळी उध्वस्त करण्यासाठी तसेच या तस्करीत सहभागी असलेल्या टोळ्यांची ओळख पटवण्यासाठी महसूल गुप्तचर संचालनालय वचनबद्ध आहे.

 
शैलेश पाटील/तुषार पवार/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2319875) अभ्यागत कक्ष : 9

BackGround Relase