पंतप्रधान कार्यालय
उदात्त मनाच्या व्यक्तीच्या गुणवैशिष्ट्यांवर प्रकाश टाकणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी केले सामायिक
Posted On:
05 OCT 2026 10:14AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उदात्त मनाच्या व्यक्तीचे आणि असामान्य व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य ठरणारे मनाची शुद्धता, त्यागाची भावना, धैर्य, सुख-दुःखा च्या समयी मनातील समभाव, कार्यक्षमता, स्नेह आणि सत्यनिष्ठा या गुणांवर प्रकाश टाकणारे एक संस्कृत सुभाषित सामायिक केले.
-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे.
“शुचित्वं त्यागिता शौर्यं सामान्यं सुखदुःखयोः।
दाक्षिण्यं चानुरक्तिश्च सत्यता च सुहृद्गुणाः॥”
मनाची शुद्धता, त्यागाची भावना, धैर्य, सुख-दुःखातील समभाव (स्थितप्रज्ञता), कार्यक्षमता, स्नेह आणि सत्यनिष्ठा - हे केवळ एका सर्वसामान्य मित्राचे गुण नाहीत, तर उदात्त हृदय आणि असाधारण व्यक्तिमत्त्व लाभलेल्या व्यक्तीची ही निर्णायक वैशिष्ट्ये आहेत,असे या सुभाषितात म्हटले आहे.
या सुभाषितातून असा संदेश दिला आहे की, मनाची शुद्धता, त्यागाची भावना, धैर्य, सुख-दुःखात समभाव, कार्यक्षमता, स्नेह आणि सत्यनिष्ठा हे केवळ एका सामान्य मित्राचे गुण नसून, उदात्त मन आणि असामान्य व्यक्तिमत्त्व लाभलेल्या व्यक्तीची वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे आहेत.
आपल्या एक्स पोस्ट वर पंतप्रधानांनी लिहिले आहे;
“शुचित्वं त्यागिता शौर्यं सामान्यं सुखदुःखयोः।
दाक्षिण्यं चानुरक्तिश्च सत्यता च सुहृद्गुणाः॥”
***
Neha Kulkarni / Sampada Patgaonkar / Madhura Nerurkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2319072)
अभ्यागत कक्ष : 6
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam