पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मधील भारतीय पथकाच्या कामगिरीबद्दल पंतप्रधानांनी केले अभिनंदन

Posted On: 04 OCT 2026 9:53PM by PIB Mumbai

आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 ची सांगता होत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्धार, उत्कटता आणि उल्लेखनीय क्रीडाभावनेने देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भारतीय पथकातील प्रत्येक सदस्याचे अभिनंदन केले.

ज्यांच्या कामगिरीमुळे देशवासीयांना अपार आनंद झाला, त्या सर्व पदकविजेत्यांचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले.

आगामी काळात या स्पर्धांमुळे आणखी मोठ्या कामगिरीसाठी प्रेरणा मिळेल आणि तळागाळातील क्रीडा क्षेत्र अधिक बळकट होण्यास मदत होईल, अशी आशा मोदी यांनी व्यक्त केली.

 मोदी यांनी ‘एक्स’वर लिहिले;

“आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 ची सांगता होत असताना, निर्धार, उत्कटता आणि उल्लेखनीय क्रीडाभावनेने आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भारतीय पथकातील प्रत्येक सदस्याचे मी अभिनंदन करतो.

देशवासीयांना अपार आनंद देणाऱ्या आपल्या सर्व पदकविजेत्यांचे अभिनंदन.

आगामी काळात या स्पर्धांमुळे आणखी मोठ्या कामगिरीसाठी प्रेरणा मिळो. तसेच तळागाळातील क्रीडा क्षेत्र अधिक बळकट करण्यासही या स्पर्धांचे योगदान लाभो.”

***

NehaKulkarni / NitinGaikwad/ DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2319056) अभ्यागत कक्ष : 14