पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

चार दशकांहून अधिक काळानंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल भारतीय महिला हॉकी संघाचे पंतप्रधानांकडून अभिनंदन

Posted On: 02 OCT 2026 7:22PM by PIB Mumbai

चार दशकांहून अधिक काळानंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल भारतीय महिला हॉकी संघाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

उत्कृष्ट कौशल्य आणि सांघिक कामगिरीमुळे हे यश मिळाले असून, संघाचा निर्धार प्रेरणादायी असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघाला आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या असून, या यशामुळे देशभरात हॉकीच्या लोकप्रियतेला चालना मिळेल, अशी आशा व्यक्त केली आहे.

पंतप्रधान कार्यालयाने ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे;

“भारतीय हॉकीसाठी अत्यंत विशेष क्षण!  आशियाई क्रीडा स्पर्धेत तब्बल चार दशकांहून अधिक काळानंतर मानाचे सुवर्णपदक मायदेशी आणणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाच्या यशाचा देशभरातील नागरिक आनंद साजरा करत आहेत. हे यश उत्कृष्ट कौशल्य आणि सांघिक कामगिरीचे फलित आहे. संघाचा निर्धारही अत्यंत प्रेरणादायी आहे. संघाच्या आगामी वाटचालीसाठी माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा.या यशामुळे देशभरात हॉकीच्या लोकप्रियतेला आणखी चालना मिळो: पंतप्रधान @narendramodi”

***

शैलेश पाटील/हेमांगी कुलकर्णी/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2318515) अभ्यागत कक्ष : 8