पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना पुष्पांजली अर्पण केली.

Posted On: 02 OCT 2026 1:24PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाट येथे महात्मा गांधी यांना आणि विजय घाट येथे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली आहे.

त्यांचे साधेपणा, धैर्य आणि राष्ट्रसेवेचे जीवन पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहील, असे मोदी यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान म्हणाले की, त्यांचे आदर्श आणि भारताच्या प्रगतीप्रती असलेली अढळ वचनबद्धता आपल्यासाठी नेहमीच मार्गदर्शक प्रकाश ठरेल.

पंतप्रधान कार्यालयाने एक्स वरील संदेशामध्ये म्हटले आहे;

"राजघाट येथे महात्मा गांधी आणि विजय घाट येथे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री जी यांना आदरांजली वाहिली.

त्यांचे साधेपणा, धैर्य आणि राष्ट्रसेवेचे जीवन पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहील.

त्यांचे आदर्श आणि भारताच्या प्रगतीप्रती असलेली अढळ वचनबद्धता आपल्यासाठी नेहमीच मार्गदर्शक प्रकाश ठरेल."

***

नेहा कुलकर्णी/नितीन गायकवाड/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2318199) अभ्यागत कक्ष : 11