गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत सरकारने लदाखच्या केंद्रशासित प्रदेशासोबत सल्ला मसलतीने, लदाखच्या केंद्रशासित प्रदेशातील 28 जागा/ भौगोलिक वैशिष्ट्यांची ओळख पटवून, भारतीय सर्वेक्षण विभागाच्या अधिकृत नकाशावर त्यांची प्रमाणित ठिकाणे व वैशिष्ट्यांची नावे केली निश्चित

Posted On: 02 OCT 2026 9:31AM by PIB Mumbai

 

भारत सरकारने लदाखच्या केंद्रशासित प्रदेशासोबत सल्ला मसलतीने, लदाखच्या केंद्रशासित प्रदेशातील 28 जागा/ भौगोलिक वैशिष्ट्यांची ओळख पटवून, भारतीय सर्वेक्षण विभागाच्या अधिकृत नकाशावर त्यांची प्रमाणित ठिकाणे व वैशिष्ट्यांची नावे निश्चित केली आहेत. यामुळे, ही स्थळे, भारतीय सर्वेक्षण विभागाच्या लदाखच्या नकाशावर अधिकृतपणे आली आहे. या स्थळांची अचूक ओळख आणि लोकांमध्ये त्या स्थळांविषयी अधिक व्यापक जनजागृती व्हावी, हा यामागील उद्देश आहे.

भारतीय सर्वेक्षण विभागाच्या अधिकृत नकाशावर चिन्हीत करण्यात आलेली ही 28 स्थळे/ भौगोलिक वैशिष्ट्ये  खालीलप्रमाणे:

लदाखचा केंद्रशासित प्रदेश (28)

अनुक्रम

स्थळाचे नाव

वैशिष्ट्य प्रकार

1

अतिशा गिरी

शिखर

2

ब्रांग्सा

भूभाग

3

चॅपचिंगल पास

खिंड

4

कनिष्क पीक

शिखर

5

करुण पीर

पर्वत

6

कुक्सेल

भूभाग

7

मार्तंड गिरी

शिखर

8

पार्पिक

हिमनदी

9

स्कामरी ग्लेशियर

हिमनदी

10

शाचमिर्क पास

खिंड

11

श्कोर्गा व्हॅली

दरी

12

झोरावर पीक

शिखर

13

देहरा कंपास

भूभाग

14

द्रक कार्पो

शिखर

15

गोगरा

भूभाग

16

जोलमोरी

पर्वत

17

कुमारायण पॉइंट

भूभाग

18

पांगलुंग

भूभाग

19

रिंचेन झांगपो

शिखर

20

शाक्यश्री गिरी

शिखर

21

गुरु रिनपोचे

तलाव

22

शमाल लुंगपा

भूभाग

23

यांगपा नदी

नदी

24

हॉट स्प्रिंग

जलाशय

25

मार्पा लोत्सावा री

शिखर

26

मिलारेपा कांगरी

शिखर

27

शिव री

शिखर

28

महेश्वर री

शिखर

या सर्व अतिरिक्त जागांसह, लदाखचा संपूर्ण नकाशा https://surveyofindia.gov.in/pages/state-maps इथे बघता येईल.

***

शिल्पा पोफळे/राधिका अघोर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2318097) अभ्यागत कक्ष : 4