पंतप्रधान कार्यालय
महात्मा गांधी यांचे सत्य, अहिंसा, करुणा आणि सेवेचे आदर्श अधोरेखित करणारे सुभाषित पंतप्रधानांनी केले सामायिक
Posted On:
02 OCT 2026 9:11AM by PIB Mumbai
पूज्य बापू यांचे संपूर्ण आयुष्यच सत्य, अहिंसा, करुणा आणि सेवेचा मार्गदर्शक दीपस्तंभ आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
बापूंचे जीवन आणि आदर्श प्रत्येक युगात मानवतेचा मार्ग प्रकाशित करत राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
पंतप्रधानांनी एक संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे-
“अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च।
निर्ममो निरहङ्कारः समदुःखसुखः क्षमी॥”
या सुभाषिताचा अर्थ असा, की, ज्या व्यक्तीच्या मनात कोणत्याही सजीवाविषयी कुठलाही द्वेष नसतो, जी सर्वांना मैत्रभाव आणि करुणेने जवळ घेते, जी कोणत्याही रागलोभविकारांपासून आणि अहंकारांपासून मुक्त असते, जी आनंद आणि दु:ख अशा दोन्ही भावनांमधे संतुलित, समभाव ठेवू शकते आणि सदैव क्षमाशील असते, अशी व्यक्ती सर्वोच्च साधक असते.
आपल्या एक्स वरच्या पोस्ट मध्ये मोदी म्हणतात;
“पूज्य बापू यांचे संपूर्ण आयुष्य, सत्य, अहिंसा, करुणा आणि सेवेचा असा दीपस्तंभ आहे, जो प्रत्येक युगात मानवतेचा मार्ग प्रशस्त करत राहील.
अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च।
निर्ममो निरहङ्कारः समदुःखसुखः क्षमी॥”
***
शिल्पा पोफळे/राधिका अघोर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2318066)
अभ्यागत कक्ष : 14