पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी केली चर्चा
दोन्ही नेत्यांनी व्यापार, संरक्षण, ऊर्जा आणि महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान या क्षेत्रांतील द्विपक्षीय सहकार्याचा घेतला आढावा
भारत-अमेरिका सर्वसमावेशक जागतिक धोरणात्मक भागीदारी पुढे नेण्याबाबतच्या कटिबद्धतेचा उभय नेत्यांकडून पुनरुच्चार
प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर, तसेच जागतिक शांतता आणि सुरक्षा वाढवण्याच्या प्रयत्नांवर उभय नेत्यांकडून विचारांची देवाणघेवाण
Posted On:
30 SEP 2026 7:20PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.
व्यापार, संरक्षण, ऊर्जा, महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान आणि परस्पर हिताच्या इतर क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्याच्या प्रगतीचा दोन्ही नेत्यानी या संवादात आढावा घेतला.
त्यांनी भारत-अमेरिका सर्वसमावेशक जागतिक धोरणात्मक भागीदारी पुढे नेण्याबाबतच्या काटिबद्धतेचा पुनरुच्चार केला आणि दोन्ही देशांतील जनतेचं हित लक्षात घेवून, परस्पर सहकार्य अधिक वृद्धिंगत करण्यासाठी सतत संपर्कात राहण्याबाबत सहमती दर्शवली.
उभय नेत्यांनी प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवरही विचार-विनिमय केला आणि जागतिक शांतता आणि सुरक्षिततेला चालना देण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांवर चर्चा केली.
यापुढेही एकमेकांच्या संपर्कात राहण्याबद्दल दोन्ही नेत्यांनी सहमती व्यक्त केली.
***
राधिका अघोर/सविता म्हसकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2317311)
अभ्यागत कक्ष : 17