पंतप्रधान कार्यालय
आशियायी क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 5000 मीटर धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक जिंकल्याबद्दल गुलवीर सिंग याचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
Posted On:
29 SEP 2026 10:01PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 सप्टेंबर 2026
आशियायी क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 5000 मीटर धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुलवीर सिंग याचे अभिनंदन केले आहे.
गुलवीर सिंग याच्यासाठी ही आशियायी क्रीडा स्पर्धा अत्यंत खास ठरली असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. पदक विजेत्यांच्या व्यासपीठावर स्थान मिळवण्याची उल्लेखनीय हॅटट्रिक अशा शब्दांत पंतप्रधानांनी गुलवीर सिंग याच्या कामगिरीचे वर्णन केले आहे.
पंतप्रधानांनी गुलवीर याचे सातत्य, संयम आणि दृढनिश्चयाची प्रशंसाही केली असून, त्याला भविष्यात अधिकाधिक यश मिळो यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.
यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाने X या समाजमाध्यमावर सामायिक केलेला संदेश:
"गुलवीर सिंग याच्यासाठी ही आशियायी क्रीडा स्पर्धा खऱ्या अर्थाने खास ठरली आहे!
पुरुषांच्या 5000 मीटर धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक जिंकल्याबद्दल त्याचे अभिनंदन. पदक विजेत्यांच्या व्यासपीठावर स्थान मिळवण्याची ही एक उल्लेखनीय हॅटट्रिक आहे. त्याचे सातत्य, संयम आणि दृढनिश्चय दखलपात्र आहे. पुढील वाटचालीत अशाच अनेक यशांसाठी त्याला शुभेच्छा: PM @narendramodi"
* * *
सुषमा काणे/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2316762)
अभ्यागत कक्ष : 11