पर्यटन मंत्रालय
स्वच्छतेवर भर देत प्रलंबित कामे निकाली काढण्यावर लक्ष केंद्रित करून विशेष मोहिम 6.0 साठी पर्यटन मंत्रालय सज्ज
2 ते 31 ऑक्टोबर 2026 दरम्यान हे अभियान राबवले जाणार, यामध्ये ई-कचऱ्याचे प्रभावी संकलन, वर्गीकरण आणि विल्हेवाट लावण्यावर विशेष भर दिला जाणार
Posted On:
29 SEP 2026 12:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 सप्टेंबर 2026
केंद्र सरकारच्या विशेष मोहिम 6.0 च्या अंमलबजावणीसाठी केंद्रीय पर्यटन मंत्रालय सज्ज झाले असून हे अभियान 2 ते 31, ऑक्टोबर 2026 दरम्यान राबवले जाणार आहे, शासकीय कार्यालयांमध्ये स्वच्छता आणि प्रलंबित कामे निकाली काढण्यावर या मोहिमेचा मुख्य भर आहे. यावर्षी या व्यापक शासकीय अभियानामध्ये विशेषतः ई-कचऱ्याचे संकलन, वर्गीकरण आणि विल्हेवाट लावण्यावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.
या विशेष मोहिम 6.0 चा भाग म्हणून केंद्र सरकारने मंत्रालये/ विभाग त्यांच्याशी संलग्न आणि अधीनस्थ कार्यालये, स्वायत्त संस्था आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम यांच्यासोबतच सार्वजनिक सेवा पुरवणाऱ्या सर्व क्षेत्रीय आणि बाह्य कार्यालयांना विशेष प्राधान्य दिले आहे. ही मोहिम दोन टप्प्यात होणार असून पहिला पूर्वतयारीचा टप्पा 15 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2026 असा आहे तर अंमलबजावणीचा टप्पा 2 ऑक्टोबर ते 31,ऑक्टोबर 2026 असा आहे.
या मोहिमेतील अंमलबजावणीची उद्दिष्टे निश्चित करण्याच्या हेतूने पर्यटन मंत्रालयाने 16 सप्टेंबर 2026 रोजी मोहिमेच्या चौकटीशी सुसंगत पूर्वतयारी बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये मंत्रालयाचे विविध कार्यक्रम विभाग, संलग्नीत संस्था आणि देशांतर्गत क्षेत्रीय कार्यालयांचा सहभाग होता. पूर्वतयारीच्या टप्प्यात कार्यालये, अधिकारी आणि क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना यासंदर्भात माहिती देणे, प्रलंबित प्रकरणे ओळखून स्वच्छता मोहिम राबवण्यासाठी जागा निश्चित करणे, निकामी करावयाच्या अतिरिक्त साहित्याचे मूल्यांकन करणे, जागेच्या कार्यक्षम व्यवस्थापनाचे नियोजन करणे, भंगाराची विल्हेवाट; अभिलेख व्यवस्थापन तसेच ई-कचऱ्याचे प्रभावी संकलन आणि वर्गीकरण करणे इत्यादी घटकांचा समावेश होतो.
विशेष मोहिम 5.0 दरम्यान पर्यटन मंत्रालयाने उत्कृष्ट कामगिरी केली होती. या मोहिमेत 92,749 चौरस फूट जागा मोकळी करण्यात आली आणि भंगार विल्हेवाटीतून 12.69 लाख रुपये प्राप्त झाले. याशिवाय सुमारे 4,700 प्रत्यक्ष फायली नष्ट करण्यात आल्या आणि 1,100 डिजिटल फायली कायमच्या बंद करण्यात आल्या. या अंतर्गत देशभर एकूण 413 स्वच्छता मोहिमा राबवण्यात आल्या होत्या.
मागील मोहिमेच्या उल्लेखनीय कामगिरीनंतर विशेष मोहीम 6.0 ची अंमलबजावणी देखील यशस्वी करण्यासाठी केंद्रीय पर्यटन मंत्रालय वचनबद्ध असून स्वच्छता वाढवणे, कार्यक्षम अभिलेख व्यवस्थापन आणि प्रलंबित प्रकरणे वेगाने निकाली काढणे या तीन मुख्य स्तंभांवर काम करत आहे.
* * *
नितीन फुल्लुके/भक्ती सोनटक्के/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2316392)
अभ्यागत कक्ष : 12