कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय
वर्ल्डस्किल्स शांघाय 2026 मध्ये भारत 10 व्या स्थानावर; भारताने जिंकली 6 रौप्यपदके आणि 20 'मेडल फॉर एक्सलन्स'
Posted On:
27 SEP 2026 9:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 सप्टेंबर 2026
चीनमधील शांघाय येथे आयोजित प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय कौशल्य स्पर्धेचा समारोप झाला आहे. 48 व्या वर्ल्डस्किल्स स्पर्धा, शांघाय 2026 मध्ये भारतीय संघाने 6 रौप्यपदके आणि 20 ‘मेडल फॉर एक्सलन्स’ पटकावून 10वे स्थान मिळवले. वर्ल्डस्किल्स लिऑन 2024 मधील भारताच्या 13व्या स्थानाच्या कामगिरीच्या तुलनेत यंदाच्या निकालात लक्षणीय सुधारणा झाली आहे. लिऑन 2024 मध्ये भारताने 4 कांस्यपदके आणि 12 ‘मेडल फॉर एक्सलन्स’ मिळवले होते. शांघायमधील यंदाची कामगिरी ही जागतिक स्तरावर भारतीय तरुणांच्या कौशल्याचे महत्त्वपूर्ण यश मानले जात आहे.
वर्ल्डस्किल्स शांघाय 2026 मध्ये भारताने मिळवलेल्या सहा रौप्यपदकांपैकी बेकरी क्षेत्रात स्मृती नाम्बियार, दंत कृत्रिम अवयव निर्मितीमध्ये मोहम्मद सलाम, डिजिटल आंतरक्रियात्मक माध्यम रचनामध्ये कोविद अजय गंगाडे, औद्योगिक रचना तंत्रज्ञानमध्ये पार्थ वोहरा, वाहतूक आणि मालवाहतूक व्यवस्थापनमध्ये मेहरून्निसा बेगम आणि किरकोळ विक्रीमध्ये सानिया जोशी यांनी रौप्यपदक पटकावले. या यशातून सर्जनशील, तांत्रिक आणि सेवा क्षेत्रातील विविध कौशल्यांमध्ये भारतीय तरुणांची उत्कृष्ट कामगिरी अधोरेखित होते.
भारताने तांत्रिक, औद्योगिक, डिजिटल, सर्जनशील आणि सेवा कौशल्यांमध्ये 20 'मेडल फॉर एक्सलन्स' देखील मिळवले. बेकरीमधील रौप्यपदक विजेती स्मृती नाम्बियार हिला भारतासाठी 'बेस्ट ऑफ नेशन' म्हणून सन्मानित करण्यात आले.
22 ते 27 सप्टेंबर 2026 दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या सहा दिवसांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा कार्यक्रमात सुमारे 70 देश आणि प्रदेशांतील 1,400 हून अधिक तरुण स्पर्धक एकत्र आले होते. भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 70 स्पर्धकांच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या तुकडीने उदयोन्मुख तंत्रज्ञान, प्रगत उत्पादन (अॅडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंग), अभियांत्रिकी, सर्जनशील उद्योग आणि विशेष सेवा यांसारख्या 63 कौशल्यांमध्ये भाग घेतला.
भारतीय संघाच्या या कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन करताना कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) जयंत चौधरी म्हणाले: "6 रौप्यपदके आणि 20 'मेडल फॉर एक्सलन्स' सह वर्ल्डस्किल्स शांघाय 2026 मधील भारतिय संघाची ही उल्लेखनीय कामगिरी आपल्या जागतिक कौशल्य प्रवासातील एक महत्त्वपूर्ण झेप आहे. आपल्या या आधीच्या कामगिरीला मागे टाकत, आपल्या तरुण स्पर्धकांनी भारताच्या कुशल प्रतिभेची वाढती ताकद आणि स्पर्धात्मकता सिद्ध केली आहे."
|
No.
|
Skill category
|
Competitor(s)
|
|
1
|
Bakery
|
Smriti Nambiar
|
|
2
|
Dental Prosthetics
|
Mohammed Salam
|
|
3
|
Digital Interactive Media Design
|
Kovid Ajay Gangrade
|
|
4
|
Industrial Design Technology
|
Parth Vohra
|
|
5
|
Logistics and Freight Forwarding
|
Mehrunissa Begum
|
|
6
|
Retail Sales
|
Saniya Joshi
|
Medal for Excellence
|
No.
|
Skill category
|
Competitor(s)
|
|
1
|
Intelligent Security Technology
|
Ragul Kanthamma Balraj
|
|
2
|
Mechatronics
|
Deepu Mudigerepalya Srinivasa; Jayanth Kariyappa
|
|
3
|
Mobile Applications Development
|
Arjun Sumathi Vijayabashkar
|
|
4
|
Electrical Installations
|
Dhanush Madhugiri Govindaraju
|
|
5
|
Plastering and Drywall Systems
|
Surenthiran Mani
|
|
6
|
Painting and Decorating
|
Muskan
|
|
7
|
Autonomous Mobile Robotics
|
Aditya Prakash; Debasish Panda
|
|
8
|
Cabinetmaking
|
Yashwanth Chary Keshoju
|
|
9
|
Jewellery
|
Joy Das
|
|
10
|
Beauty Therapy
|
Tahesin Sabir Sutar
|
|
11
|
Fashion Technology
|
Vidhi Niravkumar Suthar
|
|
12
|
Automobile Technology
|
Md Seraj
|
|
13
|
Car Painting
|
Kaif Khan
|
|
14
|
IT Network Systems Administration (ITNSA)
|
Khushraj Nimesh Rathod
|
|
15
|
Graphic Design Technology
|
Rajeeb Lochan Chand
|
|
16
|
Health and Social Care
|
Vishnupriya Sunil
|
|
17
|
Industry 4.0
|
Mallinath; Suhan Mascarenhas
|
|
18
|
Chemical Laboratory Technology
|
Sampada Desai
|
|
19
|
Additive Manufacturing
|
Pavan Bhadravati Suresha
|
|
20
|
Robot Systems Integration
|
Abhishek Somanna Shignalli; Vinay Muttayya Hiremath
|







* * *
सुषमा काणे/आशुतोष सावे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2315686)
अभ्यागत कक्ष : 6