पंतप्रधान कार्यालय
आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या लांब उडीमध्ये रौप्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी अन्सी सोजनचे अभिनंदन केले
Posted On:
27 SEP 2026 9:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 सप्टेंबर 2026
आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या लांब उडी स्पर्धेत रौप्यपदक पटकावणाऱ्या अन्सी सोजनचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले.
अन्सी सोजन हिने उत्कृष्ट आणि उत्साहपूर्ण कामगिरी केली असून, तिच्या या कामगिरीमुळे देशाला मोठा आनंद झाला आहे. येत्या काळात तिने आणखी मोठे यश मिळवावे, अशा शुभेच्छा पंतप्रधान मोदी यांनी दिल्या आहेत.
पंतप्रधान कार्यालयाने एक्स या सामाजिक माध्यमावरील एका संदेशात म्हटले आहे की,
"आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या लांब उडीच्या स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्याबद्दल अन्सी सोजन हिचे अभिनंदन! तिने उत्कृष्ट आणि उत्साहपूर्ण कामगिरी केली. तिच्या या कामगिरीमुळे देशाला मोठा आनंद झाला आहे. येत्या काळातही तिने आणखी मोठे यश मिळवत राहावे, अशा शुभेच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्याआहेत. PM @narendramodi"
* * *
सुषमा काणे/राज दळेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2315683)
अभ्यागत कक्ष : 6