पंतप्रधान कार्यालय
आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक पटकावणाऱ्या हरिता भद्राचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
Posted On:
27 SEP 2026 9:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 सप्टेंबर 2026
आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हरिता भद्रा हिचे अभिनंदन केले.
आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदार्पणात हरिता भद्राने आत्मविश्वास आणि दृढनिश्चयाने शर्यत पूर्ण करत मानाचे स्थान मिळवल्याचे पंतप्रधान म्हणाले. या शानदार कामगिरीबद्दल त्यांनी हरिताचे अभिनंदन केले आणि तिच्या या कामगिरीचा भारताला अभिमान असल्याचे नमूद केले.
पंतप्रधान कार्यालयाने ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले:
“आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत हरिता भद्रा हिने शानदार कांस्यपदक पटकावले आहे! या स्पर्धेतील पदार्पणात तिने आत्मविश्वास आणि दृढनिश्चयाने शर्यत पूर्ण करत पदकविजेत्यांच्या व्यासपीठावर मानाचे स्थान मिळवले. या शानदार कामगिरीबद्दल तिचे हार्दिक अभिनंदन. भारताला तिचा अभिमान आहे: PM @narendramodi"
* * *
सुषमा काणे/वैभवी जोशी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2315681)
अभ्यागत कक्ष : 7