मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंग उर्फ ललन सिंग यांच्या हस्ते 28 सप्टेंबर 2026 रोजी नवी दिल्लीत पशुधन विमा पोर्टलचे होणार उद्घाटन
Posted On:
27 SEP 2026 4:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 सप्टेंबर 2026
केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागातर्फे 28 सप्टेंबर 2026 रोजी नवी दिल्ली येथे पशुधन विमा पोर्टलचे उद्घाटन होणार आहे. देशातील पशुधन विमा सेवांचे डिजिटल पद्धतीने वितरण करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
या पोर्टलचा शुभारंभ केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय तसेच पंचायती राज मंत्री राजीव रंजन सिंग उर्फ ललन सिंग यांच्या हस्ते होईल.
हे पोर्टल पशुधन विम्यासाठी एकात्मिक डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देईल. या माध्यमातून पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाच्या पशुधन विमा योजनेअंतर्गत विमा पॉलिसी जारी करणे, दाव्यांची प्रक्रिया, विमा योजनांची देखरेख आणि अहवाल तयार करणे अधिक सुलभ आणि जलद होणार आहे. या पोर्टलचा अधिकाधिक पशुपालकांना लाभ मिळावा आणि त्याचा वापर सोपा व्हावा, यासाठी ते हिंदी आणि इंग्रजीसोबतच 11 प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध असेल. त्यामुळे पशुपालकांना त्यांच्या परिचित भाषेत विम्याशी संबंधित माहिती आणि सेवा सहज मिळू शकतील.
पशुपालकांना पशुधनाच्या होणाऱ्या आर्थिक नुकसानापासून अधिक चांगले संरक्षण मिळवून देणे आणि त्यांच्या उपजीविकेला दीर्घकालीन आधार देणे, तसेच पशुधन विमा सेवा अधिक पारदर्शक, कार्यक्षम, सुलभ आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
हे पोर्टल पशुधन विमा कार्यक्रमांचा अधिक चांगला समन्वय साधण्यास, प्रत्यक्ष वेळेत देखरेख ठेवण्यास आणि उपलब्ध माहितीच्या आधारे निर्णय घेण्यास मदत करेल. त्यामुळे देशभरातील पशुधन विमा सेवांची अंमलबजावणी आणि सेवा वितरण अधिक प्रभावीपणे करता येईल.
हे पोर्टल सुरू झाल्यामुळे पशुधन विम्याची प्रक्रिया अधिक सोपी होईल, संबंधित यंत्रणांची कार्यक्षमता वाढेल आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने विमा सेवा अधिक व्यापकपणे पशुपालकांपर्यंत पोहोचवता येतील. पशुधन विमा सेवा पशुपालकांच्या अधिक जवळ नेण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.
* * *
सुषमा काणे/आशुतोष सावे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2315556)
अभ्यागत कक्ष : 18