केंद्रीय लोकसेवा आयोग
azadi ka amrit mahotsav

भारत सरकारमधील विविध पदांसाठी थेट भरती


संघ लोकसेवा आयोगाकडून पात्र उमेदवारांकडून विविध पदांसाठी थेट भरतीसाठी अर्ज आमंत्रित

Posted On: 26 SEP 2026 12:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 सप्‍टेंबर 2026

 

संघ लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) भारत सरकारमधील विविध पदांवर थेट भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित केले आहेत.

जाहिरात क्रमांक 12/2026 च्या सविस्तर जाहिरातीसह उमेदवारांसाठीच्या सूचनाही आयोगाच्या https://upsc.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवार 26 सप्टेंबर 2026 ते 16 ऑक्टोबर 2026 या कालावधीत ऑनलाइन अर्ज https://upsconline.nic.in पोर्टलद्वारे करू शकतात.

उमेदवारांनी जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या सविस्तर सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

* * *

यश राणे/गजेंद्र देवडा/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2315247) अभ्यागत कक्ष : 7