कंपनी व्यवहार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने, नियमांचे पालन न करणाऱ्या 'निधी कंपन्यां'कडून दिल्या जाणाऱ्या उच्च परताव्याच्या आश्वासनांबाबत जनतेला केले सावध

Posted On: 24 SEP 2026 6:21PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 सप्‍टेंबर 2026

 

सर्वसामान्य नागरिकांना सावध करण्यासाठी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने 'निधी' कंपन्या आणि त्यांच्या कामकाजाबाबत मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. अशा कंपन्यांमध्ये विशेषतः अत्याधिक परताव्याचा दावा केला जात असेल तेव्हा योग्य पडताळणी केल्याखेरीज गुंतवणूक करू नये, असा इशारा देण्यात आला आहे. अनेक निधी कंपन्या कायद्यातील संबंधित तरतुदींचे आणि त्याअंतर्गत  नियमांचे पूर्णपणे पालन करत नसल्याचे मंत्रालयाला NDH-4 आवेदनांचे परीक्षण करताना आढळले आहे. तसेच, निधी कंपनी असलेल्या अनेक कंपन्यांनी निधी नियमांनुसार विहित मुदतीत आपला NDH-4 अर्ज सादर केलेला नाही, असेही निदर्शनास आले आहे.

निधी कंपनी म्हणून इच्छुक असलेल्या प्रत्येक कंपनीला स्वतःला निधी कंपनी म्हणून घोषित करण्यासाठी किंवा अद्ययावत करण्यासाठी "NDH-4" स्वरूपात आवेदन करणे आवश्यक आहे.

अनेक कंपन्या आपल्या सदस्यांना असामान्य अधिक परताव्याचे आश्वासन देऊन आकर्षित करतात, असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आर्थिक निर्णय घेताना केवळ एजंट्सनी सांगितलेल्या असामान्य अधिक परताव्याच्या आश्वासनांवर किंवा अनौपचारिक हमीवर अवलंबून राहू नये, असा सल्ला नागरिकांना देण्यात येत आहे. याखेरीज संबंधित कंपनीला केंद्र सरकारने "निधी" म्हणून घोषित केले आहे का, याची स्वतंत्रपणे पडताळणी करावी आणि त्यासंबंधीच्या अटी व शर्तींचा काळजीपूर्वक विचार करावा.

निधी कंपन्यांनी स्वीकारलेल्या ठेवींवर डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनद्वारे विमा संरक्षण दिले जात नाही. कंपनी बुडाल्यास किंवा त्यात घोटाळा झाल्यास ठेवीचे पैसे पूर्ण वसूल करणे अत्यंत कठीण ठरू शकते.

पूर्वीच्या कंपनी कायदा,1956 मधील कलम 620A च्या तरतुदींअंतर्गत, 'निधी' म्हणून काम करण्यास इच्छुक असलेल्या कंपन्यांना केंद्र सरकारद्वारे 'निधी' म्हणून घोषित केले जात असे. 'कंपनी कायदा, 2013' मधील कलम 406 अन्वये, सुरुवातीला एखादी कंपनी स्वतःची 'निधी' म्हणून नोंदणी करून कामकाज सुरू करू शकत होती, परंतु त्यांना निधी नियम, 2014 मधील विविध नियमांचे पालन करणे अनिवार्य होते. केंद्र सरकारने कंपनी कायदा, 1956/2013 च्या तरतुदींअंतर्गत 'निधी' म्हणून घोषित, 395 कंपन्यांची यादी, सर्वसामान्यांच्या माहितीसाठी मंत्रालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मंत्रालयाच्या पोर्टलवर 03.11.2025 रोजी प्रकाशित करण्यात आलेल्या सक्रिय निधी कंपन्यांच्या यादीची लिंक खालीलप्रमाणे आहे:

(https://www.mca.gov.in/bin/dms/getdocument?mds=J1d7pR2ZnYPDVBpl1gFu4w%253D%253D&type=open) यावर अधिक माहिती पाहता येईल.

 

* * *

सुषमा काणे/सोनाली काकडे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2314518) अभ्यागत कक्ष : 12