पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

महिलांच्या 'सांडा' 60 किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकल्याबद्दल नाओरेम रोशिबिना देवीचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

Posted On: 24 SEP 2026 5:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 सप्‍टेंबर 2026

 

महिलांच्या 'सांडा' 60 किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकल्याबद्दल नाओरेम रोशिबिना देवीचे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

सलग तीन आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये पदके जिंकणे उल्लेखनीय कामगिरी असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. तिचे सातत्य, धैर्य आणि निर्धार निश्चितच स्तुत्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधानांनी तिला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान कार्यालयाने एक्सवरील पोस्टमध्ये सामायिक केले आहे :

"महिलांच्या सांडा 60 किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकल्याबद्दल नाओरेम रोशिबिना देवीचे अभिनंदन.  सलग 3 आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये पदके जिंकणे, ही उल्लेखनीय कामगिरी आहे....तिचे सातत्य, धैर्य आणि निर्धार निश्चितच स्तुत्य आहे. भविष्यातील सर्व प्रयत्नांसाठी शुभेच्छा : PM @narendramodi"

 

* * *

नेहा कुलकर्णी/सोनाली काकडे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2314430) अभ्यागत कक्ष : 10