पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

महिलांच्या स्कीट सांघिक प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिनाझ धालीवाल,माहेश्वरी चौहान आणि रायझा ढिल्लन यांचे अभिनंदन केले

Posted On: 23 SEP 2026 4:50PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 सप्टेंबर 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महिलांच्या स्कीट सांघिक प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल परिनाझ धालीवाल, माहेश्वरी चौहान आणि रायझा ढिल्लन यांचे अभिनंदन केले.

त्यांची एकाग्रता, अचूकता आणि सांघिक कामगिरी यामुळे भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाचा आणखी एक क्षण निर्माण झाला आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. तसेच, त्यांनी त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान कार्यालयाने एक्स या समाजमाध्यमावरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे:

"महिलांच्या स्कीट सांघिक प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल परिनाझ धालीवाल, माहेश्वरी चौहान आणि रायझा ढिल्लन यांचे अभिनंदन.

त्यांची एकाग्रता, अचूकता आणि सांघिक कामगिरी यामुळे भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाचा आणखी एक क्षण निर्माण झाला आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा: पंतप्रधान @narendramodi

नेहा कुलकर्णी/राजेश शिरभाते/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2313960) अभ्यागत कक्ष : 6