पंतप्रधान कार्यालय
राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकरजी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
Posted On:
23 SEP 2026 1:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,23 सप्टेंबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकरजी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.
पंतप्रधान म्हणाले की, जनजागृती आणि राष्ट्राभिमानाच्या भावनांनी ओतप्रोत असलेल्या त्यांच्या प्रभावी कविता आजही देशवासियांच्या हृदयात शौर्य, तेज आणि आत्मसन्मान जागृत करत आहेत. ते म्हणाले की, त्यांच्या रचना केवळ साहित्यालाच समृद्ध करत नाहीत, तर मातृभूमीप्रती भक्तीची प्रेरणाही देतात. मोदी पुढे म्हणाले की, त्यांचे अफाट व्यक्तिमत्व आणि कालातीत रचना येणाऱ्या अनेक पिढ्यांपर्यंत भारतीयांना मार्गदर्शन करत राहतील.
पंतप्रधानांनी एक्स या समाजमाध्यमावर लिहिले की,
राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना माझी शतशः प्रणाम. जनजागृती आणि राष्ट्रअभिमानाच्या भावनांनी ओतप्रोत भरलेल्या त्यांच्या प्रभावी कविता आजही देशवासियांच्या हृदयात धैर्य, बुद्धिमत्ता आणि आत्मसन्मान जागृत करतात. त्यांच्या साहित्यकृती केवळ साहित्यालाच समृद्ध करत नाहीत, तर मातृभूमीप्रती समर्पणाची प्रेरणाही देतात. त्यांचे महान व्यक्तिमत्त्व आणि कालातीत कार्य युगानुयुगे भारताच्या लोकांना मार्गदर्शन करत राहील.
नेहा कुलकर्णी/राजेश शिरभाते/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2313809)
अभ्यागत कक्ष : 12
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam