पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुर्वेद दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा

Posted On: 23 SEP 2026 1:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,23 सप्टेंबर 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुर्वेदाला निरोगी आणि संतुलित जीवनासाठीचे सर्वांगीण शास्त्र म्हणून अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुर्वेद दिनानिमित्त नागरिकांना स्नेहपूर्ण शुभेच्छा दिल्या आहेत.

पारंपरिक औषधांचे कालातीत महत्त्व अधोरेखित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की आयुर्वेद ही केवळ एक उपचार पद्धती नाही तर निरोगी आणि संतुलित जीवनशैलीचे प्रभावी माध्यम आहे. पंतप्रधानांनी सर्वाना या समृद्ध वारशाला अंगिकारण्याचा संकल्प दृढ करण्याचे आवाहन केले आहे. या निमित्त पंतप्रधानांनी आयुर्वेदाच्या सर्वगुणसंपन्न वैशिष्ट्य अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले;

“आयुर्वेद दिनाच्या सर्व देशवासीयांना हार्दिक शुभेच्छा! आयुर्वेद ही केवळ उपचारपद्धती नसून, निरोगी आणि संतुलित जीवनशैली जगण्याचे एक प्रभावी माध्यम आहे. चला, आपल्या या समृद्ध वारशाचा स्वीकार करण्याचा संकल्प आणखी दृढ करूया.

हिताहितं सुखं दुःखमायुस्तस्य हिताहितम्।
मानं च तच्च यत्रोक्तमायुर्वेदः स उच्यते।।

मानवासाठी कोणती जीवनशैली हितकारक किंवा अहितकारक आहे, सुखी किंवा दुःखी जीवन कशाला म्हणावे, निरोगी आणि रोगग्रस्त जीवनात काय फरक आहे, तसेच दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी कोणत्या गोष्टींचा स्वीकार करावा आणि कोणत्या टाळाव्या, याचे विवेचन ज्या शास्त्रामध्ये केले आहे आणि ज्यामध्ये आयुष्याचे स्वरूप व प्रमाण यांचाही सविस्तर विचार केला आहे, त्याला आयुर्वेद असे म्हणतात.”


नेहा कुलकर्णी/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर 
 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2313798) अभ्यागत कक्ष : 8