आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

11व्या आयुर्वेद दिनाच्या पार्श्वभूमीवर देशव्यापी लोकसहभागाला गती

Posted On: 21 SEP 2026 8:33PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,21 सप्टेंबर 2026

देशभरात 23 सप्टेंबर रोजी 11 वा आयुर्वेद दिन  साजरा केला जाणार आहे. 'निरोगी भविष्यासाठी  आयुर्वेद ' अशी यावर्षीची  संकल्पना असून त्यानिमित्ताने देशभरात लोकसहभागाला मोठी गती मिळाली आहे. 30 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 9,700 हून अधिक उपक्रम आयोजित करण्यात आले  असून, आयुर्वेद दिनाच्या अधिकृत संकेतस्थळाद्वारे 3.6 लाखांहून अधिक नागरिकांनी यासाठी नोंदणी केली आहे. तसेच,'आयुर्वेद दिवस 2026' च्या मायक्रोसाइटद्वारे जवळपास 89.3 लाख नागरिकांनी आयुर्वेदाला आपले समर्थन दर्शवणारा संकल्प केला आहे.

'आयुर्वेद दिन 2026'ची मायक्रोसाइट ayurvedaday.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून देशव्यापी उत्सवाचा भाग म्हणून आयोजित केल्या जाणाऱ्या उपक्रमांमध्ये नागरिकांचा सहभाग, नोंदणी आणि उपक्रमांची माहिती सादर करण्यासाठी एक डिजिटल व्यासपीठ म्हणून काम करत आहे.

उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडसह अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला आहे; यावरून या देशव्यापी उपक्रमात विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा व्यापक सहभाग दिसून येतो.

आयुर्वेदाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि यात लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी विविध उपक्रम आयोजित केले जात आहेत. यामध्ये आयुर्वेदाबाबत जागरूकता कार्यक्रम, माहिती-शिक्षण-संवाद (IEC) उपक्रम,जनसंपर्क कार्यक्रम आणि आयुर्वेदावर आधारित आरोग्य व कल्याण शिबिरे यांसारख्या प्रमुख उपक्रमांचा समावेश आहे.

इतर उपक्रमांमध्ये औषधी वनस्पतींची लागवड व संवर्धन मोहीम, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये आयुर्वेदाबाबत जागरूकता कार्यक्रम, तरुणांचा सहभाग वाढवणारे उपक्रम, 'आयुर्वेद आहार' आणि आरोग्यदायी आहार पद्धतींना प्रोत्साहन देणारे अभियान , नागरिक प्रतिज्ञा अभियान आणि आयुर्वेद-विषयक प्रश्नमंजुषा यांचा समावेश आहे.

हे उपक्रम जागरूकता, निरामय आरोग्य आणि सहभागाच्या माध्यमातून नागरिक, शैक्षणिक संस्था, विविध समुदाय आणि संस्थांना एकत्र आणत आहेत, ज्यामुळे 'आयुर्वेद दिन' कार्यक्रमात व्यापक लोकसहभागाची संधी उपलब्ध होत आहे.

11 व्या आयुर्वेद दिनाच्या निमित्ताने भारताबाहेरील देशांचाही सहभाग दिसून आला, 10  देश आणि प्रदेशांमध्ये आयोजित  उपक्रमांमध्ये 1,900 हून अधिक सहभागींनी भाग घेतला.

यात सहभागी देश आणि प्रदेशांमध्ये ब्रिटिश हिंद महासागर क्षेत्र , ब्रिटन, अफगाणिस्तान, बल्गेरिया, स्पेन, अल्जेरिया, ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क, आइसलँड आणि अमेरिका यांचा समावेश आहे.

हा आंतरराष्ट्रीय सहभाग 'आयुर्वेद दिना'चा वाढता विस्तार आणि आयुर्वेदप्रति जागरूकता, निरामय आरोग्य व लोकसहभाग यांवर केंद्रित उपक्रमांमध्ये भारताबाहेरील विविध समुदाय, संस्था व संघटनांचा सहभाग दर्शवतो.


निलिमा चितळे/सुषमा काणे/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2313210) अभ्यागत कक्ष : 6