माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

'सर्जनशील अर्थव्यवस्था' ही भारताच्या विकासाची पुढील महत्त्वाची आघाडी म्हणून उदयास येत असून, त्यातून तरुण भारतीयांसाठी नवीन संधी उपलब्ध होत आहेत: डॉ. एल. मुरुगन


2030 पर्यन्त ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स (VFX), गेमिंग आणि कॉमिक्स् अर्थात AVGC क्षेत्रात सुमारे 20 लाख कुशल व्यावसायिकांची गरज भासण्याची शक्यता; तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी

युवकांना भविष्यासाठी कौशल्य-सुसज्ज करण्यासाठी सरकारचा  भारतीय सर्जनशील तंत्रज्ञान संस्था (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीज) आणि एव्हीजीसी सर्जनशील प्रयोगशाळांना (क्रिएटर लॅब्ज) सरकारचे पाठबळ

Posted On: 18 SEP 2026 2:39PM by PIB Mumbai


माहिती आणि  प्रसारण आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांच्या हस्ते  आज ओ.पी. जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटी येथे 'कायदा, धोरण आणि सर्जनशील अर्थव्यवस्था' या विषयावरील 'जिंदाल पॉलिसी कॉन्क्लेव्ह'चा  उद्घाटन समारंभ पार पाडला. यावेळी त्यांनी उद्घाटनपर भाषण केले.

तरुण सहभागींना संबोधित करताना, डॉ. मुरुगन यांनी कल्पना, कल्पनाशक्ती, संस्कृती, नवोन्मेष आणि बौद्धिक संपदा यांच्या माध्यमातून भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेच्या वेगवान विकासावर प्रकाश टाकला. ते म्हणाले की चित्रपट, संगीत, गेमिंग, अॅनिमेशन, डिझाइन, प्रकाशन, जाहिरात आणि डिजिटल सामग्री यांसारखी क्षेत्रे रोजगार आणि उद्योजकतेच्या नवीन संधी निर्माण करत आहेत.

जागतिक सकल देशांतर्गत उत्पादनात अर्थात जीडीपीमध्ये  सर्जनशील अर्थव्यवस्थेचा वाटा 3.1  टक्के आणि जागतिक रोजगारातील वाटा 6.2 टक्के आहे; तसेच, अंदाजे 5.7 कोटी भारतीय आधीच सांस्कृतिक आणि सर्जनशील क्षेत्रातील व्यवसायांमध्ये कार्यरत आहेत. भारताच्या अर्थव्यवस्थेत प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन क्षेत्रातील क्षेत्राचे  एकूण बाजारमूल्य अडीच लाख कोटी रुपये इतके आहे.

तरुण भारतीयांसाठी असलेल्या संधींवर प्रकाश टाकताना त्यांनी सांगितले की, 2030  पर्यंत एकट्या  AVGC क्षेत्रातच सुमारे 20  लाख कुशल व्यावसायिकांची गरज भासण्याची शक्यता आहे. या उदयोन्मुख संधींसाठी तरुणांना सज्ज करण्याच्या उद्देशाने, सरकारने 15,000 शाळा आणि 500 महाविद्यालयांमध्ये ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीज’ आणि एव्हीजीसी क्रिएटर लॅब्जसाठी पाठिंबा जाहीर केला आहे.

सर्जनशील अर्थव्यवस्थेच्या विकासाला, कॉपीराइट संरक्षण, निर्मात्यांना योग्य मोबदला आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा जबाबदार वापर यासह योग्य कायदेशीर आणि धोरणात्मक चौकटी यांचे पाठबळ मिळाले पाहिजे  यावर डॉ. मुरुगन यांनी भर दिला. तरुणांनी आदर, तर्क आणि पुराव्यांच्या आधारे विविध गृहितके आणि संस्थांबाबत प्रश्न विचारण्याचे आणि 2047 पर्यंत विकसित भारत घडवण्यासाठी त्यांच्या कल्पना आणि कौशल्यांचे  योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले.

***

सुषमा काणे/सविता म्हसकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2312202) अभ्यागत कक्ष : 13