पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

भारताची विकास गाथा 'नील क्रांती'ला कशाप्रकारे आणखी एक यशोगाथा बनवत आहे हे अधोरेखित करणारा एक लेख पंतप्रधानांनी केला सामायिक

Posted On: 17 SEP 2026 6:57PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,17 सप्टेंबर 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचा एक लेख सामायिक केला. सी. पी. राधाकृष्णन यांनी लिहिले आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची विकास गाथा 'नील क्रांती'ला आणखी एक यशोगाथा बनवत आहे. भारत आपल्या सागरी संपत्तीचा पुरेपूर वापर करण्यासाठी  किनाऱ्याच्या पलीकडेही शोध घेत आहे यावर या लेखात भर देण्यात आला आहे. तसेच, शाश्वत मत्स्यव्यवसायामुळे किनारी भागातील समुदाय, युवा आणि महिलांसाठी नवीन संधी निर्माण होत आहेत आणि त्याद्वारे किनारी भारताची आर्थिक स्थिती बळकट होत आहे.

पंतप्रधान कार्यालयाने 'एक्स ' वर पोस्ट केले:

“उपराष्ट्रपती @VPIndia Thiru @CPR_VP यांचा एक अत्यंत वाचनीय लेख; यात त्यांनी लिहिले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची विकास गाथा नील क्रांतीला आणखी एक यशोगाथा बनवत आहे. ते म्हणतात की, भारत आपल्या सागरी संपत्तीचा पुरेपूर वापर करण्यासाठी  किनाऱ्याच्या पलीकडेही शोध घेत आहे . शाश्वत मत्स्यव्यवसायामुळे किनारी भागातील समुदाय, युवा आणि महिलांसाठी नवीन संधी निर्माण होत आहेत. यामुळे भारताच्या किनारी भागाची आर्थिक स्थितीही बळकट होत आहे.”

https://indianexpress.com/article/opinion/columns/vice-president-c-p-radhakrishnan-india-blue-economy-fisheries-revolution-10881220/
राधिका अघोर/सुषमा काणे/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2311594) अभ्यागत कक्ष : 6