पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

तंत्रज्ञान,विश्वास आणि नागरिकांचा सहभाग यावर लक्ष केंद्रित केलेल्या प्रशासकीय प्रारूपावर प्रकाश टाकणारा एक लेख पंतप्रधानांनी केला सामायिक

Posted On: 17 SEP 2026 4:44PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,17 सप्टेंबर 2026

देशभरात विविध कार्यक्रम आणि योजना राबवण्यासाठी तंत्रज्ञान, विश्वास आणि नागरिक सहभाग यालाकेंद्रस्थानी ठेवणारे पंतप्रधानांचे प्रशासकीय मॉडेल, कसे आहे, यावर प्रकाश टाकणारा, नीती आयोगाचे सदस्य असलेल्या राजीव गौबा यांचा एक लेख, पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी आज सामायिक केला आहे.

डिजिटल प्रणाली, थेट हस्तांतरण योजना, सोपे नियम आणि पारदर्शक खरेदी यांमुळे कार्यक्षमता आणि उपलब्धता कशी सुधारत आहे,ज्यामुळे सुशासन हे भारताच्या विकासासाठी कशाप्रकारे एक आर्थिक संपत्ती बनत आहे;यावर गौबा यांनी या लेखातून माहिती दिली आहे.

पंतप्रधान कार्यालयाने X वर पोस्ट केले:

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे प्रशासकीय मॉडेल, देशभरात विविध योजना आणि कार्यक्रम राबवण्यासाठी तंत्रज्ञान, विश्वास आणि नागरिकांच्या सहभागाला केंद्रस्थानी ठेवत आहे,असे नीती आयोग, सदस्य,राजीव गौबा ‌ लिहितात. 

डिजिटल प्रणाली, थेट हस्तांतरण योजना, सुलभ नियम आणि पारदर्शक खरेदी यांमुळे कार्यक्षमता आणि उपलब्धता कशी सुधारत आहे, आणि त्यामुळे सुशासन हे भारताच्या विकासासाठी एक आर्थिक संपत्ती कसे बनत आहे, याविषयी त्यांनी माहिती दिली आहे. 


राधिका अघोर/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2311436) अभ्यागत कक्ष : 11