उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

उपराष्ट्रपतींच्या हस्ते, डॉक्टर तमिलिसाई सुंदरराजन लिखित रा.स्व.संघाच्या सेवा शतकावरील पुस्तकाचे प्रकाशन

Posted On: 15 SEP 2026 9:43PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 सप्टेंबर 2026

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्ण यांनी दिल्ली येथील उपराष्ट्रपती भवनात तेलंगणचे माजी राज्यपाल आणि पुद्दुचरीचे उपराज्यपाल डॉक्टर तमिलिसाई सुंदरराजन लिखित 'ए सेन्च्युरी ऑफ सर्विस-द आरएसएस इन 100 अॅक्ट ऑफ सेवा'- पुस्तकाचे प्रकाशन केले.

उपस्थितांना संबोधित करताना उपराष्ट्रपती म्हणाले की, या पुस्तकामध्ये (राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या) आरएसएसच्या शतकभराच्या सेवेचे, त्यांच्या सामाजिक जबाबदारीचे आणि राष्ट्रउभारणीतील त्याच्या योगदानाचे दस्ताऐवजीकरण केले आहे.

"आजची बातमी ही उद्याचा इतिहास असते" असे नमूद करून सी. पी. राधाकृष्णन यांनी चांगल्या कामाची नोंद ठेवण्याचे महत्त्व विषद केले, अन्यथा लोकांच्या स्मरणातून ती कामे  पुसली जाऊ शकतात. सेवा भावाचे सातत्यपूर्ण समाजसेवेत कसे रूपांतरित होते,  याचे चित्रण या पुस्तकात करण्यात आले आहे असे त्यांनी सांगितले.

"सेवा हा धर्म, आणि कर्तव्य आहे," या मूलभूत आदर्शाचा उल्लेख करत उपराष्ट्रपती म्हणाले की आरएसएसचे सेवा उपक्रम गरीब, उपेक्षित आणि समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचले आहेत, ज्यामध्ये कामगार, महिला आणि मुलांचा समावेश आहे. कोविड 19च्या साथीच्या काळात अन्न, औषध आणि अत्यावश्यक मदत पुरवण्यात संघाच्या स्वयंसेवकांनी बजावलेल्या भूमिकेचे स्मरण त्यांनी करून दिले.

पुस्तकातील "चारित्र्य निर्माणाद्वारे राष्ट्र निर्मिती" या विषयसूत्राचा संदर्भ देत उपराष्ट्रपती म्हणाले की,  राष्ट्र निर्माणासाठी राष्ट्रभक्ती, शिस्त, सामाजिक जबाबदारी आणि राष्ट्रीय एकता अत्यंत आवश्यक आहे.

ते म्हणाले की, हे पुस्तक  म्हणजे केवळ आरएसएसच्या शतकभराच्या सेवेची माहिती   नाही,  तर तो भावी पिढ्यांसाठी भारताच्या सेवा, संस्कृती आणि राष्ट्रीय जाणीवेचे प्रतिबिंब दर्शवणारा महत्त्वाचा दस्तऐवज ठरेल.

उपराष्ट्रपतींनी डॉ. तमिलिसाई सुंदरराजन आणि या प्रकाशनाशी निगडीत सर्वांचे अभिनंदन केले; तसेच भविष्यात इतिहासाचे दस्तऐवजीकरण करणारे असे आणखीही प्रयत्न केले जातील अशी आशाही व्यक्त केली.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन, पुदुचेरीचे गृहमंत्री श्री ए. नमसिवायम्, डॉ. तमिलिसाई सुंदरराजन यावेळी उपस्थित होते.


सुवर्णा बेडेकर/विजयालक्ष्‍मी साने/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2310694) अभ्यागत कक्ष : 6