श्रम आणि रोजगार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

इमारत आणि इतर बांधकाम कामगारविषयक दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्यापासून मुंबईत आयोजन


इमारत आणि इतर बांधकाम कामगारांसाठी राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांनी, डिजिटल आणि तंत्रज्ञान-आधारित उपक्रमांच्या अंमलबजावणीला दिला वेग

नऊ राज्ये/केंद्रशासित प्रदेश, बीओसीडब्लू डिजिटल कामगार चौकाचे करणार अनावरण; मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगाल ऑनलाईन बीओसीडब्लू उपकर संकलन पोर्टलचे करणार उद्घाटन

बिहार आणि पश्चिम बंगाल कामगार चौक आणि सुविधा केंद्रांचे करणार उद्घाटन

Posted On: 10 SEP 2026 6:52PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 सप्टेंबर 2026

केंद्र सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाने, महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने, इमारत आणि इतर बांधकाम कामगार म्हणजेच, बीओसीडब्लू च्या राष्ट्रीय परिषदेचे मुंबईत, उद्या, म्हणजेच 11 आणि 12 सप्टेंबर 2026 मध्ये आयोजन केले आहे. केंद्रीय श्रम आणि रोजगार तसेच युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री, डॉ. मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली उद्यापासून ही परिषद सुरु होईल.

या परिषदेला, केंद्रीय कामगार व रोजगार तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री शोभा करंदलाजे, राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे कामगार मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी, बांधकाम कामगार कल्याण मंडळांचे  अध्यक्ष आणि  सचिव तसेच केंद्र आणि राज्य सरकारांमधील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

नवी दिल्लीत नोव्हेंबर 2025 मध्ये झालेल्या राष्ट्रीय कामगार परिषदेत सुरू करण्यात आलेल्या तीन प्रमुख उपक्रमांच्या प्रगतीचाही या परिषदेत आढावा घेतला जाणार आहे. यामध्ये राज्य बांधकाम कामगारांसाठी डिजिटल कामगार चौक, कामगार चौक आणि सुविधा केंद्रे आणि ऑनलाइन बीओसीडब्लू उपकर संकलन पोर्टल यांचा समावेश आहे. रोजगाराच्या संधी सुलभ करणे, कामगार-केंद्री तसेच अधिक सन्मानजनक आणि सुलभ सेवा उपलब्ध करून देणे तसेच उपकर संकलन आणि त्याच्या देखरेखीमध्ये पारदर्शकता आणि  कार्यक्षमता वाढवणे, हे या उपक्रमांचे उद्दिष्ट आहे.

राज्ये/ केंद्रशासित प्रदेश डिजिटल कामगार चौकाचा उपक्रम नेत आहेत पुढे

राज्य बीओसीडब्लू डिजिटल कामगार चौकाच्या अंमलबजावणीचा एक भाग म्हणून, महाराष्ट्र, तेलंगणा, दिल्ली, मध्य प्रदेश, झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि ओडिशा ही राज्ये/केंद्रशासित प्रदेश, या परिषदेदरम्यान आपापल्या उपक्रमांचाही शुभारंभ करणार आहेत.

राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे बांधकाम आणि इतर बांधकाम कामगारांना रोजगाराशी संबंधित सेवांचा अधिक सुलभपणे लाभ घेता येणार आहे.

ऑनलाईन बीओसीडब्लू उपकर संकलन पोर्टल

बीओसीडब्लू  उपकर संकलन आणि देखरेख यात अधिक पारदर्शकता आणि कार्यक्षमता आणण्यासाठी, डिजिटल तंत्रज्ञान अधिक मजबूत करण्याच्या हेतूने, राज्ये देखील या डिजिटल यंत्रणेचा अंगीकार करत आहेत.  मध्यप्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांत, ऑनलाईन बीओसीडब्लू  उपकर संकलन पोर्टलचेही या परिषदेदरम्यान उद्घाटन  होणार आहे. उपकर संकलन आणि देखरेख अधिक सुसंगत व्हावी, या दृष्टीने हा उपक्रम राबवला जात आहे, तसेच बीओसीडब्लू आराखड्या अंतर्गत , डिजिटल प्रक्रिया आणि मजबूत व्हावी, हा ही उद्देश आहे.

कामगार चौक आणि सुलभता केंद्रे

बिहार आणि पश्चिम बंगालच्या ‘लेबर’ चौक आणि सुविधा केंद्र उपक्रमांचा शुभारंभ मुंबई इथे होणाऱ्या बीओसीडब्लू परिषदेत करण्यात येणार आहे.

या केंद्रांमुळे बांधकाम कामगारांना रोजगार आणि कल्याणकारी सेवांचा लाभ घेणे तसेच आवश्यक सहाय्य मिळवणे अधिक सुलभ होईल.

राष्ट्रीय कामगार परिषदेत सुरू करण्यात आलेल्या उपक्रमांची प्रत्यक्ष पातळीवर अंमलबजावणी करण्यासाठी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडून करण्यात येत असलेल्या प्रयत्नांचे प्रतिबिंब या उपक्रमांमधून दिसून येते. या राज्यांना आलेल्या अनुभवातून, इतर राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये त्या पद्धती काही बदल करून किंवा तशाच्या तशा राबवण्याची संधी इतर राज्यांना मिळू शकेल.

या दोन दिवसीय परिषदेचा उद्देश, केंद्र, राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि बीओसीडब्लू कल्याण मंडळांमध्ये अधिक उत्तम समन्वय निर्माण करणे, अंमलबजावणीतील त्रुटी आणि उणिवा ओळखणे तसेच बांधकाम कामगारांना सामाजिक सुरक्षा, कल्याणकारी सेवा आणि रोजगाराच्या संधी अधिक प्रभावीपणे व सुलभतेने उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्यक्रमाने उपाययोजना निश्चित करणे हा आहे.

सुवर्णा बेडेकर/ राधिका अघोर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2308860) अभ्यागत कक्ष : 15