पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांची प्रिन्स रहीम आगा खान पंचम यांच्याबरोबर भेट; आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कसोबतची भागीदारी अधिक दृढ करण्याबाबत चर्चा

Posted On: 10 SEP 2026 4:43PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 सप्टेंबर 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे इस्माईली समुदायाचे 50 वे इमाम, महामहीम प्रिन्स रहीम आगा खान पंचम यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, मोदी यांनी महामहीम प्रिन्स रहीम आगा खान पंचम  यांचे वडील, दिवंगत आगा खान चतुर्थ यांचे आणि विकासाच्या प्रयत्नांमधील त्यांच्या अमूल्य योगदानाचे   स्मरण केले.

 पंतप्रधानांनी आरोग्यसेवा, कृषी, ग्रामीण विकास, युवा सक्षमीकरण आणि महिला सक्षमीकरण यांसारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये 'आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्क'सोबतची भागीदारी अधिक दृढ करण्याच्या विविध मार्गांवर चर्चा केली.

 एक्स समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये मोदी यांनी लिहिले आहे की,

 "महामहीम प्रिन्स रहीम आगा खान पंचम यांची भेट घेऊन आनंद झाला. त्यांचे वडील, दिवंगत आगा खान चतुर्थ आणि विकासाच्या प्रयत्नांमधील त्यांचे अमूल्य योगदान यांचे मी स्मरण केले.

आरोग्यसेवा, कृषी, ग्रामीण विकास तसेच युवा आणि महिला सक्षमीकरण या क्षेत्रांत आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्क सोबतची आमची भागीदारी अधिक दृढ करण्याच्या मार्गांवर चर्चा केली.

@akdn”


निलीमा चितळे/राजेश शिरभाते/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2308747) अभ्यागत कक्ष : 10